पाकिस्तान हॉकी टीम(फोटो-सोशल मीडिया)
FIH Junior Hockey World Cup 2025 : अलिकडेच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला. यानंतर भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवत लष्करी कारवाई करत पाकिस्तानला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले. या संबंधांचा परिणाम हा क्रीडा क्षेत्रावर झालेला दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तान हॉकी संघाने आशिया कपसाठी भारतात येण्यास नकार दर्शवला होता. परंतु आता पाकिस्तानच्या हॉकी संघाने FIH ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक-चिरागची उपांत्य फेरीत धडक! भारताचे पदक पक्के
भारतात होणाऱ्या FIH ज्युनियर हॉकी विश्वचषकात पाकिस्तान संघ सहभागी होणार असल्याचा निर्णय पाकिस्तानकडून घेण्यात आला आहे. हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग यांनी याबाबत माहीत देत सांगितले की, “पाकिस्तानने या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या FIH ज्युनियर हॉकी विश्वचषकात आपला सहभाग निश्चित केला आहे.” FIH ज्युनियर हॉकी विश्वचषक हा हॉकीच्या जगातला एक प्रतिष्ठित कार्यक्रम मानला जातो. या स्पर्धेत जगभरातील २१ वर्षांखालील संघ आपला सहभाग नोंदवबत असतात. या स्पर्धेमुळे तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी उपलब्ध करून देते. तसेच भविष्यातील स्टार्सना उदयास यायला या स्पर्धेमुळे मदत होते. भारत यावेळी FIH ज्युनियर हॉकी विश्वचषका स्पर्धेचे आयोजन करणार आहे.
FIH ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप २०२५ या वर्षी भारतात आयोजित करण्यता आला आहे. हा विश्वचषक २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई येथे खेळवण्यात येणार आहे, ज्यामध्ये एकूण २४ संघ सहभागी होणार आहे. भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसह, चिली आणि स्वित्झर्लंडसह पूल ब गटात आहेत. जर्मनी हा गत ज्युनियर पुरुष विश्वविजेता संघ असून २०२३ च्या आवृत्तीच्या अंतिम फेरीमध्ये फ्रान्सचा २-१ असा पराभव करून विक्रमी सातवे विजेतेपद आपल्या नावावर केले.
हेही वाचा : US Open 2025 : नोवाक जोकोविचने रचला इतिहास! ब्रिटिश खेळाडू कॅमेरॉन नारीचा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश
भारतातील बिहारमधील राजगीर हॉकी आशिया कप २०२५ खेळवण्यात येत आहे. परंतु, पाकिस्तान संघाने आशिया कपपूर्वी भारतात येण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तान आशिया कप संघात सहभागी झालेला नाही. सुरक्षेच्या कारण पुढे करून पाकिस्तानने भारतात येण्यास नकार दिला होता. परंतु आता पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडून FIH ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपसाठी संघ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.