अर्धा संघ गारद होऊनही पाकिस्तानने जिंकला सामना (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आशिया कप सुपर फोर सामन्यात श्रीलंकेकडून मिळालेल्या १३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने पाच धावांत तीन विकेट गमावल्या. साहिबजादा फरहान आणि फखर जमान या जोडीने पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. मात्र, त्यानंतर श्रीलंकेने पाकिस्तानला सलग तीन धक्के दिले. साहिबजादा फरहान (२४), फखर जमान (१७) आणि सैम अयुब (२) धावांवर धडाधड बाद झाले. मात्र नावेझ आणि तलतने हा डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि पाकिस्तानला विजयाजवळ आणून पोहचवले. हा सामना अगदी अटीतटीचा झाला हे मात्र नक्की!
श्रीलंकेचा डाव
पहिल्या डावात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानने श्रीलंकेला १३३ धावांवर रोखले. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या गोलंदाजांनी त्याचा निर्णय योग्य ठरवला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी स्पर्धेत पहिल्यांदाच आपल्या उत्कृष्ट कामगिरीत परतला. आफ्रिदीने डावाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांना बाद केले. निसांका ८ धावांवर बाद झाला तर कुसल मेंडिस आपले खाते उघडू शकला नाही.
कुसल परेराने केले निराश
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा कुसल परेरा १२ चेंडूत १५ धावांवर हरिस रौफच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा कर्णधार चारिथ असलंका १९ चेंडूत २० धावांवर हुसेन तलतच्या गोलंदाजीवर बाद झाला. तलतने माजी कर्णधार शनाकालाही शून्य धावांवर बाद केले. श्रीलंकेने ७.३ षटकांत ५८ धावांत ५ गडी गमावले. वानिंदू हसरंगा १३ चेंडूत १५ धावा काढून बाद झाला आणि तो श्रीलंकेचा सहावा बळी ठरला. त्यावेळी श्रीलंकेची धावसंख्या १२.१ षटकात १२ बाद ८० अशी होती.
मेंडिसच्या अर्धशतकाने उभारली धावसंख्या
कामिंदू मेंडिस आणि चमिका करुणारत्ने यांनी ४३ धावा जोडून संघाला १२३ धावांपर्यंत पोहोचवले. विकेट पडण्याच्या दरम्यान कामिंदू मेंडिसने अर्धशतक झळकावले. ४४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा काढून कामिंदू बाद झाला. चमिका करुणारत्नेच्या १७ धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेला २० षटकात ८ बाद १३३ धावांपर्यंत मजल मारता आली.
शाहीन आफ्रिदीने ४ षटकात २८ धावा देत ३ बळी घेतले. आफ्रिदीने कामिंदू मेंडिसचाही बळी घेतला. हुसेन तलतने ३ षटकात १८ धावा देत २ बळी घेतले. हरिस रौफने ४ षटकात ३७ धावा देत २ बळी घेतले. अबरार अहमदने अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. अबरारने 4 षटकात केवळ 8 धावा देत 1 बळी घेतला. फहीम अश्रफ विकेटशिवाय गेला.
Asia Cup 2025 Super 4 : पाकिस्तानचा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; श्रीलंका करणार फलंदाजी
अबरारचे लज्जास्पद कृत्य
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरारने केलेल्या सेलिब्रेशनमुळे तो चर्चेत आला होता. आता, श्रीलंकेविरुद्धच्या त्याच्या सेलिब्रेशनने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याने वानिंदू हसरंगाला बाद केल्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनची नक्कल करून त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. तथापि, हसरंगाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि तो पॅव्हेलियनकडे चालत राहिला. खरं तर, जेव्हा जेव्हा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने विकेट घेतली तेव्हा तो घंटा वाजवून हावभाव करून सेलिब्रेशन करतो.
नवाझने फिरवली मॅच हसरंगाची ओव्हर ठरली महाग
हसरंगाच्या महागड्या षटकात दोन चौकार लागले. त्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांवरील दबाव कमी झाला. त्यानंतर दबाव श्रीलंकेवर आला कारण त्यांना पाच विकेट घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागले. शेवटच्या सहा षटकांत पाकिस्तानला जिंकण्यासाठी ३७ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या षटकात १० धावा मिळाल्या आणि लागोपाठ ६ मारून पाकिस्तानने आपला विजय निश्चित केला.
दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन: सॅम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.
श्रीलंकेचे प्लेइंग इलेव्हन: पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, चारिथ असालंका (कर्णधार), दासुन शनाका, कामिंदू मेंडिस, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, दुष्मंथा चमेरा, नुस्वांथरा.