श्रीलंका आणि पाकिस्तान सामना(फोटो-सोशल मीडिया)
Sri Lanka vs Pakistan, Asia Cup Super 4 : आशिया कप २०२५ स्पर्धेत आज श्रीलंका आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमाणाऱ्या श्रीलंकेने ८ विकेट गमावून १३३ धावा केल्या आहेत. पाकिस्तानला हा सामाना जिंकण्यासाठी १३४ धावा कराव्या लागणार आहे. या सामन्यात श्रीलंकेची फलंदाजी खूपच निरशाजनक झाली आहे. श्रीलंकेकडून कामिंडु मेंडिसने सर्वाधिक ५० धावा केल्या. तर पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेचा डाव
सामन्याआधी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. पाकिस्तानच्या कर्णधाराचा हा निर्णय चांगलाच फायद्यात पडला. श्रीलंकेची सुरवात चांगली झाली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्याच चेंडूवर कुसल मेंडिस भोपळा न फोडता माघारी परतला. त्याला शाहीन आफ्रिदी बाद केले. त्यानंतर श्रीलंकेला १८ धावांवर पथुम निसांकाच्या रूपात दूसरा झटका बसला. निसांकाला ८ धावांवर शाहीन आफ्रिदीने आपली शिकार बनवले.
त्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. कुसल परेरा १५, कर्णधार चरिथ असलांका २०, दासुन शनाका ०, वानिंदु हसरंगा १५ , कामिंडु मेंडिसने ५० धावा करून श्रीलंकेला १०० पार नेण्यात मोठे योगदान दिले. त्याला ५० धावांवर शाहीन आफ्रिदी आपला तिसरा बळी बनवला. दुष्मंता चमीरा १, चमिका करुणारत्ने १७ धावा आणि महीश तीक्षणा ० धावा करून नाबाद राहिले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी सर्वाधिक ३ विकेट, हुसैन तलत आणि हारिस रौफने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर अबरार अहमदने १ विकेट घेतली .
श्रीलंका संघ : पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, चरिथ असलांका (कर्णधार), दासुन शनाका, कामिंडु मेंडिस, वानिंदु हसरंगा, दुष्मंता चमीरा, नुवान तुषारा, नुवानिदु फर्नांडो, बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा.
पाकिस्तान संघ : सैम अयूब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद