फोटो सौजन्य - मीडिया
लक्ष्य सेन विरुद्ध ली झी जिया : भारताचा युवा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा काल सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्याचा मुकाबला डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसनसोबत झाला होता. व्हिक्टर ऍक्सेलसन सध्या बॅडमिंटनच्या खेळामध्ये जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सलग दोन्ही गेम जिंकून सामना जिंकला आणि फायनल गाठली आहे. पण भारताच्या युवा खेळाडूला आज ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. आज त्याचा ब्रॉन्झ मेडल सामना रंगणार आहे. हा सामना त्याचा मलेशिया बॅडमिंटपटू ली झी जियासोबत होणार आहे. ली झी जिया हा सध्या जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर आहे.
लक्ष्य सेन आणि ली झी जिया हे दोघे आतापर्यत ४ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताच्या लक्ष्य सेनने ३ सामने जिंकले आहेत तर ली झी जियाने १ सामना जिंकला आहे. परंतु पॅरिस ऑलिम्पिकच्या या मोठ्या मंचावर कोणता खेळाडू कसा खेळतो याचा अंदाज लावणं कठीण आहे. त्यामुळे दोन्ही मजबूत खेळाडू आज आमनेसामने असणार आहेत. मागील आकडेवारी पाहता लक्ष्य सेनचे पारडं जड दिसत आहे.
Brace yourselves, the bronze-medal match is almost here 💪
Indian shuttler Lakshya Sen 🇮🇳 will square off against Lee Zii Jia 🇲🇾 today at #Paris2024 🏸 pic.twitter.com/ICJ28VkUwM
— Olympic Khel (@OlympicKhel) August 5, 2024
लक्ष्य सेन विरुद्ध ली झी जिया म्हणजेच भारत विरुद्ध मलेशिया यांच्यामधील बॅडमिंटनचा सामना आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:०० वाजता सुरु होणार आहे. हे दोन्ही खेळाडू आज ब्रॉन्झ मेडलसाठी लढणार आहेत. हा सामना तुम्ही JIO Cinema वर पाहू शकता.