सौजन्य - Doordarshan Sports
Indian athlete Praveen Kumar won Gold Medal in Men’s high jump : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. भारतीय ॲथलीट प्रवीण कुमार (T44) याने 6 सप्टेंबर (शुक्रवार) रोजी पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकले. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचे हे सहावे सुवर्ण ठरले. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने प्रथमच सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 5 सुवर्णपदके जिंकली होती.
प्रवीण कुमारची सुवर्णभरारी
Another Gold for India 🥳
Praveen Kumar soars to incredible heights, clinching the Gold Medal in the Men's High Jump T64 at #Paralympics2024! 🥇👏#Paris2024 #Cheer4Bharat #Paralympics2024@mansukhmandviya @IndiaSports @MIB_India @PIB_India @DDNewslive @ParalympicIndia… pic.twitter.com/szYTJMY4Kv
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 6, 2024
या अगोदर उंच उडीत आलेत दोन पदके
पॅरिस आॅलिम्पिकपेक्षा पॅरालिम्पिकमध्ये भारताने दर्जेदार कामगिरी करीत पदकांची मालिका सुरुच ठेवली आहे. पॅरिस आॅलिम्पिकमध्ये भारत सरकारने करोडो रुपयांचा खर्च केला तरीही पदकांची संख्या 7 च होती. परंतु, पॅरालिम्पिकमध्ये भारताने दमदार कामगिरी करीत 21 पदकांची चांगली कमाई केली आहे.
पदकतालिकेत भारत सध्या १४व्या क्रमांकावर
प्रवीणने 2.08 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत अमेरिकेच्या डेरेक लॉकडंटने रौप्यपदक तर उझबेकिस्तानच्या टेमुरबेक गियाझोव्हने कांस्यपदक पटकावले. डेरेकचा सर्वोत्तम 2.06 मीटर होता. टेमुरबेकने 2.03 मीटरची सर्वोत्तम उडी मारून कांस्यपदक जिंकले.
प्रवीण कुमारची सुवर्णपदकाला गवसणी
प्रवीण कुमारच्या सुवर्णपदकासह, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताच्या पदकांची संख्या आता 26 वर पोहोचली आहे.भारताने आतापर्यंत 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 12 कांस्य पदके जिंकली आहेत. भारत 26 पदकांसह पदकतालिकेत 14 व्या क्रमांकावर आहे. सध्याच्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील ॲथलेटिक्समधील भारताचे हे 14 वे पदक होते.