पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (फोटो- ट्विटर)
IPL 2025: आजच्या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या फलंदाजांनी हा निर्णय एकदम योग्य ठरवला. पंजाबने 20 ओव्हर्समध्ये तुफान फलंदाजी करत 245 धावा फटकावल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने केवळ 36 चेंडूत 82 धावा केल्या. पंजाबकडून सर्वात जास्त धावा या श्रेयस अय्यरने केल्या. त्या शिवाय प्रभसीमरनने 42 टर प्रियांशने 36 धावा केल्या.
𝘛𝘩𝘢𝘵'𝘴 𝘴𝘰𝘮𝘦 𝘚𝘩𝘳𝘦𝘺𝘢𝘴 𝘚𝘩𝘰𝘸 🫡
Shreyas Iyer leading #PBKS with intent as he races to his faster #TATAIPL half-century in just 22 balls 💪
PBKS are 160/2 after 13 overs.
Updates ▶ https://t.co/RTe7RlYbGY #TATAIPL | #SRHvPBKS pic.twitter.com/DP43BCC4uF
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
यंदाच्या हंगामात हैदराबादने सर्वाधिक धावसंख्या उभारली होती. त्यानंतर आज पंजाबच्या संघाने सर्वोच्च अशी दुसरी धावसंख्या उभारली आहे. पंजाबने आज दोन विक्रम रचले आहेत. हैदराबाद संघाचे गोलंदाजांची आज चांगलीच धुलाई झाली. मोहम्मद शमीने सर्वाधिक धावा दिल्या.
पंजाब किंग्जच्या फलंदाजांची बल्ले-बल्ले
पंजाबच्या ओपनर्सने हा निर्णय योग्य ठरवला. आणि यंदाच्या हंगामातील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा दूसरा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चालू असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जने इंडियन प्रीमियर लीगमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर नोंदवला. श्रेयस अय्यर कर्णधार असलेल्या पंजाबने पॉवरप्लेमध्ये दूसरी सर्वोच्च धावसंख्या केली आहे. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 6 ओव्हर्समध्ये 89 धावा केल्या. या धावा करताना पंजाबने एक गडी गमावला.
आजच्या सामन्यातील बदल
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने कमिंडू मेंडिसने संघासाठी काही विशेष कामगिरी केली नाही त्यामुळे आजच्या सामन्यात त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्या जागेवर इशान मलिंगाला संघामध्ये स्थान मिळाले. पंजाब किंग्सच्या संघाने संघामध्ये कोणताही बदल केला नाही. पंजाब किंग्सचा संघ दमदार फॉर्ममध्ये आहे त्यामुळे आज पंजाबच्या फलंदाजीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.
पंजाब किंग्सचा या वर्षी कर्णधार बदलला आहे. संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कमालीची फलंदाजी करत आहे. त्याचबरोबर संघाचे प्रशिक्षक देखील बदलले आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने आतापर्यत ४ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी ३ विजय मिळवले आहेत आणि १ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हैदराबादचा संघ कागदावर मजबूत दिसत होता पण त्यांनी चाहत्यांना प्रचंड निराश केले आहे. संघाने आतापर्यत ५ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना फक्त पहिल्या राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे त्यानंतर सलग चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पंजाब किंग्सची प्लेइंग ११ :
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॉन्सन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल.
सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग ११ :
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी, इशान मलिंगा.