विराट कोहली आणि रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
BCCI Central Contract : चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा आणि तारांकित फलंदाज विराट कोहली यांच्याबद्दल भवितव्याबद्दल बोलले जात आहे. तसेच त्यांच्या निवृत्तीच्या देखील चर्चा अधून मधून होता असतात. तसेच आता या दोन दिग्गज खेळाडूंबाबत बोलले जाता आहे की, यावेळी बीसीसीआय त्यांच्यावर गंडात्तर आणू शकते. मात्र, अशीही बातमी समोर येत आहे की, बीसीसीआय काही खेळाडूंना मोठी संधी देण्याच्या तयारीत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) नुकतीच भारतीय महिला क्रिकेट संघाचा केंद्रीय करार जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये एकूण 16 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या करार यादीबाबत मात्र अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही. याबाबत बोर्डाने अद्याप काही जाहीर केलेले नाही.
हेही वाचा : PBKS vs GT : शशांक सिंगचा रुद्रावतार, एकाच षटकात लगावले पाच चौकार; सिराजच्या गोलंदाजीची काढली पिसे..
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या केंद्रीय यादीबाबत सांगेच झालं तर साधारणपणे वर्षाच्या सुरुवातीला ही यादी जाहीर करण्यात येते. मात्र यावेळी यादी जाहीर करायला उशीर होत आहे. आगामी काही दिवसांत बीसीसीआय ती यादी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीमध्ये एकूण 4 श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी A+ ही श्रेणी वरच्या क्रमांकावर आहे. त्या श्रेणीत सध्या रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, शर्मा, जाडेजा यानी विराट या तिघांनी टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती पत्करली आहे. त्यामुळे त्यांच्या श्रेणीत बदल होण्याची शक्यता आहे.
एका अहवालानुसार, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंना A+ श्रेणीमधून काढून टाकण्याबाबत किंवा कायम त्यांना कायम ठेवण्याबाबत बीसीसीआयमध्ये मतभिन्नता आहे. हे तीन खेळाडू A+ श्रेणीतच राहावेत, अशी काही अधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, तर काही त्याच्या विरोधात आहेत. A+ श्रेणीमध्ये त्याच खेळाडूंना कायम ठेवले जातात, ज्यांचे स्थान तिन्ही फॉरमॅटमध्ये निश्चित झाले आहे. त्याचवेळी रोहित, विराट आणि जडेजा यांनी एकाच फॉरमॅटमधून निवृत्ती पत्करली आहे. A+ या श्रेणीतील खेळाडूंना बीसीसीआय दरवर्षी ७ कोटी रुपयांची मोठी रक्कम देत असते.
हेही वाचा : Suryakumar Yadav : मिस्टर 360 ने मुंबईत खरेदी केले दोन आलिशान फ्लॅट; किंमत वाचून भरेल धडकी..
अहवालात असे देखील महटले आहे की, स्टार फलंदाज श्रेयस अय्यरचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये पुनरागमन होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. श्रेयस अय्यरला गेल्या वेळी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर तो गेल्या सहा महिन्यांत देशांतर्गत क्रिकेट तसेच टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करताना दिसून आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये देखील त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली होती. त्यामुळे तो पुन्हा केंद्रीय कंत्राट यादीत परतण्याची शक्यता आहे.