फोटो सौजन्य : X
क्वालिफायर 2 चा सामना आज अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे हा सामना पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स अजून संघांमध्ये रंगणार आहे. आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे पंजाबच्या संघाला मागील सामन्यात पराभवाचे सामना करावा लागला होता तर मुंबईचा संघाने गुजरातच्या संघाला पराभूत करून क्वालिफायर दोन मध्ये स्थान पक्के केली आहे. आज संघ विजयी होईल तो संघ फायनलचे तिकीट मिळवणार आहे तर जो संघ पराभूत होईल तो शर्यतीतून बाहेर होणार आहे. आता रोहित शर्मा चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी रोहित शर्माचा एक व्हिडिओ हा लहान मुलांसोबत व्हायरल होत आहे, यामध्ये तो लहान मुलांसोबत संवाद साधतानाचे संभाषण आहे ते व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्स आता त्यांच्या सहाव्या आयपीएल जेतेपदावर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यासाठी हार्दिक पंड्याच्या संघाला प्रथम पंजाब किंग्ज आणि नंतर आरसीबीला अंतिम फेरीत पराभूत करावे लागेल, जे तितके सोपे असणार नाही. क्वालिफायर २ च्या आधी, रोहित शर्माचा मुलांसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मुलाने रोहितला विचारले, “सर, मी तुम्हाला कसे बाहेर काढू शकतो?”, रोहितने गमतीने उत्तर दिले, “नाही, असे होऊ शकत नाही”.
“sir apako kaise out karne ka”?
Rohit Sharma 🗣️- “Nahi wo nahi ho skata”😂👌🏼 pic.twitter.com/KLjQJ6w0wh
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) May 31, 2025
रोहित शर्मासाठी आयपीएल २०२५ हा हंगाम संमिश्र राहिला आहे. या हंगामात तो बहुतेकदा प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळताना दिसला आहे. गुजरात टायटन्ससोबत खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात रोहितने शानदार फलंदाजी केली आणि ५० चेंडूत ८१ धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने २२८ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल, गुजरात टायटन्सला फक्त २०८ धावा करता आल्या आणि एमआयने २० धावांनी सामना जिंकला. रोहितला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. आता पंजाब किंग्ज विरुद्धच्या क्वालिफायर २ मध्ये, चाहत्यांना रोहितकडून अशाच शानदार कामगिरीची अपेक्षा असेल. एलिमिनेटर सामन्यात, रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो ही जोडी मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आली, कारण रायन रिकल्टन दक्षिण आफ्रिकेत परतला आहे आणि तो सध्या संघाचा भाग नाही.