श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार(फोटो-सोशल मीडिया)
PBKS vs RCB Final Match : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामाचा अंतिम महामुकाबला आज म्हणजे ३ जून रोजी खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जेतेपदाचा सामना खेळणार आहेत. सामन्यापूर्वी पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ फलंदाजी करणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत असून पंजाब किंग्जची धुरा अनुभवी श्रेयस अय्यरकडे आहे. दोन्ही संघ आपले पहिले आयपीएल टायटल मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
चालू हंगामात आरसीबीने शानदार प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जनेही आपल्या दमदार खेळाने सर्वांना सुखद धक्का दिला आहे. परंतु पहिल्या क्वालिफायर सामन्यात त्यांना आरसीबीकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. ही विसरून आजच्या सामन्यावर लक्ष्य कएडरीत करावे लागणार आहे. परंतु, क्वालिफायर २ मध्ये पंजाबने मुंबईचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
आयपीएलच्या इतिहासात आरसीबी आणि पंजाब किंग्ज एकूण ३६ वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वेळा सामन्यात बाजी मारली आहे तर त्याच वेळी, पंजाब किंग्जने देखील तेवढेच १८ सामने जिंकले आहेत. म्हणजेच, दोन्ही संघ हेड टू हेडमध्ये समान पातळीवर आहेत. अशा परिस्थितीत, आता आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात दोघांमध्ये अटीतटीचा सामना होणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.
आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यात एकूण तीन सामने खेळवण्यात आले आहेत. या दरम्यान, पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने बेंगळुरूचा ५ विकेट्सने पराभव केला होता. त्याच वेळी, त्यानंतरच्या दोन सामन्यांमध्ये आरसीबीने अय्यरच्या संघावर दबदबा राखत त्यांचा पराभव केला आहे. एका सामन्यात बंगळुरूने ७ धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात एकूण ८ विकेट्सने विजय मिळवला आहे.
आयपीएल २०२५ चा पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळवण्यात आला होता. या दरम्यान आरसीबीने संपूर्ण सामन्यात आपला दबदबा कायम राखला होता. या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना धावांसाठी झगडायला लावले होते. त्यानंतर पंजाब किंग्जचा संघ १४.१ षटकांत १०१ धावांवर गारद झाला होता. त्यानंतर बंगळुरूने छोटेखानी लक्ष्य १० षटकांत पूर्ण करून विजय मिळवला होता. या विजयासह आरसीबीने फायनलमध्ये प्रवेश मिळवला.
विराट कोहली, फिल्ल साॅल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंस्टन, जितेश शर्मा, रोमरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड, सुयश शर्मा
प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, जोस इंग्लिॉश, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टायनिस, अजमतुल्ला उमरजाई, विशक विजय कुमार, काइल जेमिसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह