फोटो सौजन्य : Punjab Kings
श्रेयस अय्यरला मोठा विक्रम नोंदवण्याची संधी : अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज पंजाबचा सामना पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजेस बंगळुरु विरुद्ध होणार आहे. हा सामना मनोरंजक होणार आहे कारण रजत पाटीदार च्या संघाने श्रेयस यांच्या संघाला 101 धावांवर गुंडाळल्या होत्या आणि पराभूत करून फायनल मध्ये स्थान पक्की केले होते. पण त्यानंतर पंजाब किंग्सच्या संघाने क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करून या फायनल मध्ये इंट्री गेली आहे. यामध्ये विशेष कौतुक म्हणजेच पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याचे.
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यांमध्ये सुरुवातीचे दोन विकेट लवकर गमावल्यानंतर श्रेयस मैदानावर धावांचा पाऊस पाडला. मुंबई इंडियन्स विरुद्ध 203 धावांचे मोठे लक्ष्य समोर असताना सुरुवातीचा वेळ खेळ सांभाळून त्यांनी स्वतःला सांभाळले आणि शेवटच्या काही ओव्हरमध्ये त्याने षटकांचा पाऊस केला. मुंबई इंडियन्स विरुद्ध श्रेयस 41 चेंडूंमध्ये 87 धावा केल्या. यामध्ये त्याने आठ षटकार आणि पाच चौकार मारले. आता श्रेयस अय्यर नवा विक्रम त्याच्या नावावर करणार आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहे.
अय्यरने बंगळुरूविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४ षटकार मारले तर तो सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याला मागे टाकेल, ज्याच्याकडे एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे. अभिषेकने गेल्या वर्षी हैदराबादसाठी ४२ षटकार मारले होते, तर अय्यरने आयपीएलच्या चालू हंगामात ३९ षटकार मारले आहेत.
RCB VS PBKS : गोलंदाज करणार कमाल की फलंदाजांची चालणार मनमानी? वाचा अहमदाबादच्या खेळपट्टीचा अहवाल
रविवारी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात अय्यरने मुंबई इंडियन्सविरुद्ध ४१ चेंडूत ८७ धावा करत आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीच्या जोरावर पंजाबने मुंबईने सहा चेंडू आधीच दिलेले २०४ धावांचे लक्ष्य गाठले. त्याने त्याच्या खेळीदरम्यान धाडसी खेळ केला आणि आठ षटकार मारले, तसेच जसप्रीत बुमराह सारख्या गोलंदाजांचाही धाडसी सामना करून मुंबईचा विजय हिसकावून घेतला. या शानदार खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले. जर श्रेयसने पंजाबसोबत आयपीएल २०२५ चे विजेतेपद जिंकले, तर तो वेगवेगळ्या संघांसोबत दोन आयपीएल ट्रॉफी जिंकणारा इतिहासातील पहिला कर्णधार बनेल.