आशिया कपमध्ये (Asia Cup) पाकिस्तान (Pakistan) संघाचा दारूण पराभव झाल्यानंतर आता पाकिस्तानचा क्रिकेट संघ विश्वचषकासाठी (World Cup) सज्ज झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी २० विश्वचषकासाठी १५ जणांचा संघ जाहीर केला असून यात दुखापतीमुळे आशिया कपमध्ये न खेळलेल्या शाहीन आफ्रिदीचीही निवड करण्यात आली आहे. सध्या शाहीन आफ्रिदी (Shahin Afridi) उपचारांकरीता लंडनचा (London)गेला आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शाहीनच्या उपचारासाठी पैसे दिले नसल्याचा खुलासा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एका मुलाखतीत केला आहे.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती पुरामुळे बिकट झाली आहे. खराब आर्थिक स्थितीचा परिणाम पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ही दिसून येत आहे. आफ्रिदीने बोर्डाच्या आर्थिक स्थितीचा खुलासा केला आहे. आफ्रिदी म्हणाला की, आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंवर उपचार देखील करू शकत नाही. शाहीनला स्वत:च्या पैशाने लंडनला जावे लागले आणि उपचाराचा खर्चही तिला स्वत: उचलावा लागला. तिथे राहण्यापासून ते जेवण आणि तिकीटाचा खर्चही शाहीननेच केला आहे.
पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर शाहिद आफ्रिदी म्हणाला (Shahid Afridi), कधीकधी खूप अडचणी येतात. शाहीनबद्दल सांगायचं झालं तर तो स्वतःच्या पैशावर इंग्लंडला गेला. क्रिकेटपासून तेथे राहण्याचा खर्च स्वतःला त्याने उचलला आहे. मी इथून डॉक्टरची व्यवस्था केली होती. तेथून त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने सर्व काही स्वतः केले. पीसीबी यात काहीच केली नाही. शाहिदच्या या वक्तव्यांनंतर क्रिकेट क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानचा युवा स्टार शाहीन आफ्रिदीचा सासरा आहे. शाहिदच्या मोठ्या मुलीचे शाहीनसोबत लग्न होणार असून लग्नाची तारीख अजून ठरलेली नाही.