Ajit Pawar's Last Phone Call Before Plane Crash: 'आपण सर्व जाती-धर्मांना पुढे घेऊन जाऊ'; अजित पवारांचे शेवटचे संभाषण
जिल्हा परिषदेच्या जागावाटपावरून निर्माण झालेला असंतोष दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे. जागावाटपाबाबत तक्रार करणाऱ्या श्रीजीत पवार यांचा गैरसमज दूर करण्यासाठी दादांनी थेट विमान लँडिंगच्या वेळी त्यांना फोन केला. श्रीजीत पवार यांनी पत्रकार परिषदेत या फोनकॉलची माहिती देत दोघांमधील संवादाची ऑडिओ क्लिपच ऐकवली. कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेत अजित पवारांनी तात्काळ संवाद साधल्याने राजकीय वर्तुळात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.
‘लाडकी बहीण’मुळे राज्याच्या तिजोरीवर पडतोय भार; मुख्यमंत्र्यांकडून घेतले जात आहेत अनेक कठोर निर्णय
अजित पवार यांचा विमान अपघात सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास झाला. त्यापूर्वी १० मिनिटे आधी श्रीजीत पवार यांनी त्यांना मेसेज केला होता. अपघात होण्यापूर्वी अजित पवारांनी त्यांचा गैरसमज दूर करत त्यांची समजूत काढली. सकाळी ८.३७च्या सुमारास अजित पवारांशी त्यांचं शेवटचं बोलणं झालं. ” आपण सर्व जाती धर्मांना पुढे घेऊन जाऊयात, असा त्यांचा शेवटचा संवाद होता.
श्रीजीत पवार हे अजित पवारांचे चुलत पुतणे आहेत. मला काही अडचण आल्यानंतर मी त्यांना मेसेज करतो. वेळ मिळाल्यावर ते लगेच फोन करतात. जिल्हा परिषदेच्या तिकिट वाटपावरून माझा गैरसमज झाला होता. त्यासाठी मी त्यांना मेसेज केला होता. त्यावर त्यांनी विमानाच्या लँडिंग वेळी फोन केला. आपण सर्वजाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत, असं दादांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले, तुम्हाला काहीही माहिती नसते, त्यामुळे तुम्ही काहीतरी बोलत असता, पण आपण सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जातो बाळा. आपण सर्व एकत्र राहतो. सर्वांना न्याय देण्याचं काम करूयात. आपण माळी समजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. ओबीसीचे आरक्षण होते, ते बाकीच्यांनी दिले नाही. पण आपण दिले. इतर पक्षाने दुसऱ्याला उमेदवारी दिली. पण आपण सर्वांना व्यवस्थित उमेदवारी दिली. ” असं श्रीजीत पवारांनी सांगितले.






