डाव्या बाजूला माजी माजी लिबियाई हुकूमशाह कर्नल मुअम्मर गद्दाफी आणि उजव्या बाजूला त्यांचा मुलगा सैफ-अल-इस्लाम गद्दाफी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप! पॅलेस्टाईनमध्ये निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान
मीडिया रिपोर्टनुसार, ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी पश्चिम लिबियातील झिंतान शहरात गद्दाफी यांच्या निवासस्थानी हल्ला झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुखवटे घातलले चार अज्ञात हल्लेखोर सैफ-अल-इस्लाम यांच्या घरात घुसले. हल्लेखोरांनी घरात घुसताच सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि नंतर सैफ-अल-इस्लाम यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. स्थानिक वेळेनुसार, दुपारच्या सुमारास हल्लेखोरांनी घुसखोरी केली होती. या घटनेनंतर संपूर्ण लिबियामध्ये खळबळ उडाली आहे. हा हल्ला विश्वासघातकी हल्ला असल्याचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिबायाच्या अटर्नी जनरल कार्यालयाने या घटनेचा तपास सुरु केला आहे. हल्ल्यामागील कारण अस्पष्ट असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोरांनी सैफ-अल-इस्लामी यांच्या मृत्यूची खात्री होताचा तिथून पळ काढला होता. तपासांमध्ये हा हल्ला नियोजती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सैफ-अल-इस्लाम गद्दाफी हे माजी लिबियाई नेते (हुकूमशाह) कर्नल मुअम्मर गद्दाफी यांच्या सात मुलांमधील सर्वात प्रभावी आणि जागतिक स्तरावर ओळखले जाणारे व्यक्तीमत्व होते. त्यांनी लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आपली पीएडी पूर्ण केली होती. त्यांनी पाश्चिमात्य देशांशी संबंध सुधारण्यावर अधिक भर दिला होता. परंतु २०११ मध्ये लिबियन क्रांतीवेळी त्यांनी त्यांच्या वडिलांना साथ दिली होती. यामुळे त्यांच्यावर दडपशाहीचा आरोप केला जातो.
२०११ नंतर इस्लाम यांना अटक करण्यात आली होती. परंतु नंतर त्यांची सुटका झाली. २०१५ मध्ये त्यांना न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. परंतु काही कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांची सुटका झाली २०२१ मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदासाठी लढण्याचा विचार केला होता. परंतु सुरक्षा आणि कायदेशीर अडचणींमुळे त्यांचा अर्ज अस्वीकार करण्यात आला. दरम्यान नुकत्याच झालेल्या त्यांच्या हत्येने लिबियाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
🚨🇱🇾 BREAKING: Saif al-Islam Gaddafi, son of late Libyan leader Muammar Gaddafi, has been assassinated. pic.twitter.com/nVtM1gzJsn — Jackson Hinkle 🇺🇸 (@jacksonhinklle) February 3, 2026
Terror Attack: पोलिओ डोस द्यायला गेले अन् जीवाला मुकले; पाकिस्तानमध्ये Polio बुथवर दहशतवादी हल्ला
Ans: लिबियाच्या माजी हुकूमशाह कर्नल मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा सैफ-अल-इस्लाम यांची हत्या पश्चिम लिबियातील झिंतान शहरात गद्दाफी यांच्या निवासस्थानी ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी हत्या करण्यात आली.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, मुखवटे घातलले चार अज्ञात हल्लेखोर सैफ-अल-इस्लाम यांच्या घरात घुसले. हल्लेखोरांनी घरात घुसताच सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि नंतर सैफ-अल-इस्लाम यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या.






