फोटो सौजन्य - नरेंद्र मोदी युट्युब चॅनेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी काल भेट घेतली. यावेळी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी देशाला संबोधले आणि त्यांचे ऑलिम्पिकचे स्वप्न देखील सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आमंत्रित केले होते. तेव्हा त्यांनी सर्वात आधी प्रश्न विचारला की, इथे आलेले कोणते कोणते खेळाडू हे हारून आले आहेत. यावेळी बऱ्याच खेळाडूंनी हात वरती केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही हारून आले नाहीत तुम्ही त्या खेळांमधून शिकून आला आहात. कारण खेळ हा असा एकमेव घटक आहे ज्यामधून आपण कधी पराभूत होत नाही शिकून येत असतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारले की, खेळाच्या व्यतिरिक्त तुम्ही पॅरिसमध्ये काय केले ते मला जाणून घ्यायचं आहे. यावेळी लक्ष्य सेनने सांगितले की, माझा जास्त करून सामान्यांवर लक्ष्य केंद्रित होत. परंतु जेव्हा मला वेळ मिळत होता तेव्हा आम्ही बाकीच्या देशांच्या खेळाडूंसोबत डिनर शेअर केले. त्याचबरोबर आम्ही त्यांच्याकडून बरंच काही शिकलो आहोत. तिकडे ज्याप्रकारे वातावरण होत कारण हे माझं पाहिलं ऑलिम्पिक होत आणि एवढ्या मोठ्या स्टेडियममध्ये खेळणं, सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मी थोडा नर्व्हस होतो पण मी त्याचा आनंद घेतला.
शुटर अंजुम मोडगील म्हणाली की, यंदा जे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चं वर्ष होत ते फक्त खेळाडूंसाठीच नाही तर सर्व भारतीयांसाठी भावनिक होत. कारण जे खेळाडू रोजच्या जीवनामध्ये अनुभवतो ते पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या या १० दिवसांमध्ये अनुभवले. बरेच जण चौथ्या क्रमांकावर राहिले तर काही आनंदी क्षण देखील अनुभवायला मिळाले त्याचबरोबर विनेश फोगाटसोबत झालेली घटना.
पंतप्रधानांनी भारताचा दिग्गज हॉकी गोलकिपर पीआर श्रीजेशच्या निवृत्तीवर प्रश्न विचारला की, निवृत्तीची योजना आता केली की कधीपासूनच निवृत्तीची तयारी होती. यावर खेळाडूने सांगितले की, बऱ्याच काळापासून विचार करत होती निवृत्तीचा, मला असे वाटत होते की २००२ मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय खेळ खेळलो. २० वर्षांपासून खेळत आलो आहे त्यामुळे मग चांगल्या मंचावरून निवृत्ती करावी. ऑलिम्पिक असा मंच आहे जिथे संपूर्ण दुनिया उत्सव साजरा करते त्यामुळे याहून चांगला क्षण नव्हता असे श्रीजेशने सांगितले.