फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित केलं आहे. यावेळी भारताचे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या ११७ खेळाडूंची तुकडी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त भेटणार आहे. या सर्व खेळाडूंना आधीच या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते. पदक विजेत्या खेळाडूंसह सर्व खेळाडूंना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. एवढेच नाही तर संपूर्ण भारतीय संघाला पंतप्रधान निवासस्थानी भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे.
मीडियाच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी सर्व ऑलिम्पिक खेळाडूंना भेटणार आहेत. टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये झालेल्या खेळांमध्ये भारताने ७ पदक नावावर केले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी कोविड महामारीमध्ये ऑलिम्पिक खेळाडूंचा हा कार्यक्रम आयोजित केला होता, जिथे भारतीय संघाने एकूण ७ पदके जिंकली होती. त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण ऑलिम्पिक तुकडीसोबत खास बैठक घेतली आणि खेळाडूंसोबत डिनरही आयोजित केले आहे.
हेदेखील वाचा – भारताचे हेड कोच गौतम गंभीरने परिवारासोबत साजरा केला स्वातंत्र्य दिन
२०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंसोबत डिनर आयोजित केले होते. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर भाषण संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वाजल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेणार आहेत. अशा स्थितीत पंतप्रधान भारतीय संघातील सर्व खेळाडूंसोबत दुपारचे जेवण घेऊ शकतात आणि चहाची चुणूक घेताना दिसणार आहेत. गेल्या वेळी जेव्हा पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना भेटले तेव्हा त्यांची छायाचित्रे चर्चेचा विषय ठरली होती. नीरज चोप्राकडून भालाफेकीबद्दल शिकलो आणि सगळ्यांसोबत मजा मस्ती करताना दिसले होते.