फोटो सौजन्य - ProKabaddi सोशल मीडिया
प्रो कबड्डी लीग 2024 : भारतामध्ये ज्याप्रकारे क्रिकेटची क्रेझ आहे त्याचप्रमाणे आता देशामध्ये कब्बडीच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता प्रो कबड्डी लीग 2024 शेवटच्या टप्प्यात आहे. प्रो कबड्डी लीग 2024 च्या सेमीफायनलसाठी चार संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये हरियाणा स्टिकर्स, युपी योद्धा, दबंग दिल्ली आणि पटना पायरेट्स हे संघ उपांत्य फेरीचे सामने आज खेवर आहेत. यामध्ये हरियाणा स्टिकर्सचा सामना युपी योद्धाशी होणार आहे. तर दबंग दिल्लीचा सामना पटना पायरेट्सशी होणार आहे. आजच्या दोन्ही सामन्यांमध्ये जे दोन्ही संघ विजय मिळवतील ते संघ प्रो कबड्डी लीग 2024 फायनलचा सामना खेळणार आहेत.
यूपी योद्धा आणि हरियाणा स्टीलर्सबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. हरियाणा स्टीलर्सने लीग टप्प्यात सर्वाधिक सामने जिंकले होते आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर यूपी योद्धा हा संघ गेल्या १० सामन्यांमध्ये पराभूत झालेला नाही आणि त्यामुळेच कब्बडी चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दमदार आणि मनोरंजक सामना पाहायला मिळणार आहे.
Semi-final 1️⃣ is about to drop the ultimate thriller as the Steelers take on Yoddhas 🤩🔥
Get all the LIVE updates on 👉 https://t.co/cfORnVakqn or the Pro Kabaddi Official App 📱#ProKabaddi #LetsKabaddi #PKL11 #ProKabaddiOnStar #HaryanaSteelers #UPYoddhas #PKLPlayoffs pic.twitter.com/6sxmp7SLBl
— ProKabaddi (@ProKabaddi) December 27, 2024
नवीन (रेडर), विनय (रेडर), शिवम पटारे (रेडर), संजय (उजवे कव्हर), जयदीप दहिया (डावे कव्हर), राहुल सेटपाल (उजवा कोपरा), मोहम्मदरेझा शाडलू (डावा कोपरा).
गगन गौडा (रेडर), भवानी राजपूत (रेडर), भरत हुडा (रेडर), सुमित सांगवान, (डावा कोपरा), हितेश (डावा कव्हर), आशु सिंग (उजवे कव्हर) आणि महेंद्र सिंग (डावे कव्हर).
IND vs AUS : रोहित शर्मा जडेजावर भडकला! म्हणाला – त्याला आऊट कोण करणार मग? व्हिडीओ व्हायरल
दुसरा उपांत्य फेरीचा सामना दबंग दिल्ली आणि पाटणा पायरेट्स यांच्यात रंगणार आहे. या दोन्ही संघांमधील सामना खूपच स्फोटक होण्याची अपेक्षा आहे, कारण दोन्ही संघांचे रेडर्स जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. एकीकडे आशु मलिक जबरदस्त परफॉर्मन्स दाखवत आहेत तर दुसरीकडे देवांक आणि अयान जबरदस्त टॅलेंट दाखवत आहेत. त्यामुळे या खेळाडूंमधील स्पर्धा पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
Dabangs & Pirates battle it out for a place in the #PKL11 Final 💙💚
Get all the LIVE updates from Semi-Final 2️⃣ on ➡ https://t.co/cfORnVakqn or the Pro Kabaddi Official App 📱#ProKabaddi #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #DabangDelhiKC #PatnaPirates #PKLPlayoffs pic.twitter.com/DmksKG2RSr
— ProKabaddi (@ProKabaddi) December 27, 2024
देवांक (रेडर), अयान (रेडर), हमीद (ऑलराउंडर), दीपक सिंग (उजवे कव्हर), नवदीप (उजवा कोपरा), गुरदीप (ऑलराउंडर) आणि अंकित जगलान (डावा कोपरा).
आशू मलिक (रेडर), नवीन कुमार (रेडर), आशिष (अष्टपैलू), संदीप (डावा कव्हर), योगेश (उजवा कोपरा), आशिष मलिक (डावा कोपरा) गौरव छिल्लर (अष्टपैलू).