फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पीव्ही सिंधू : भारताची स्टार पीव्ही सिंधूच्या हाती पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये निराशा हाती लागली. तिला यामागूचीविरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताच्या बॅडमिंटन खेळाडूंकडून पॅरिस ऑलिम्पिक २०२४ निराशा हाती लागली. पीव्ही सिंधू पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर दुखापतीमुळे ती बराच वेळा कोर्टच्या बाहेर होती. आता ती पुन्हा कोर्टवर पुनरागमन करणार आहे. गेल्या 1-2 वर्षात सिंधूची व्यावसायिक कारकीर्द अनेक दुखापतींमुळे आणि ढासळत चाललेल्या प्रकारामुळे विस्कळीत झाली. आता सिंधू निराशाजनक कामगिरीनंतर नव्या प्रशिक्षकासह मॅटवर दिसणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सिंधुकडून भारतीय प्रेक्षकांना पदकाची अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला. त्यानंतर, भारतीय शटलरने तिच्या व्यावसायिक कारकिर्दीतून ब्रेक घेण्याचा आणि तिचा आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. सिंधूचे लक्ष्य आता २०२६ मध्ये जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविण्याचे लक्ष्य आहे.
सिंधूच्या व्यावसायिक कारकिर्दीतील या सर्व अलीकडील घडामोडींना तिचे वडील पीव्ही रमण यांनी पुष्टी दिली. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रमण म्हणाले की, सिंधूकडे सिद्ध करण्यासाठी काहीही उरले नाही, परंतु तरीही तिला वाटते की ती आशियाई क्रीडा स्पर्धेत लक्ष्य करू शकते.
Pv sindhu ropes in Anup Sridhar as coach for European Tours
💥 She has resumed training in Gachibowli, Hyderabad and will start with Arctic Open (Oct 8-13)#Sindhu pic.twitter.com/dK6U91U8XG
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) September 23, 2024
भारताचे माजी शटलर अनुप श्रीधर हे आता पीव्ही सिंधूचे नवे प्रशिक्षक असणार आहेत. काही महिन्यांपूर्वी अनुप श्रीधर ज्याने अलीकडेच प्रतिभावान युवा शटलर लक्ष्य सेनसोबत आपला कार्यकाळ संपवला तो सिंधूला तिच्या ‘रीसेट’ प्रक्रियेत मार्गदर्शन करणार आहेत. जानेवारी २०२४ पर्यंत श्रीधरने लक्ष्य सेनसोबत अप्रतिम खेळ केला. दरम्यान, सिंधूचा तिचा पूर्वीचा प्रशिक्षक, इंडोनेशियाचा अगुस द्वी सँटोसो यांच्यासोबतचा करार ऑलिम्पिकनंतर संपुष्टात आला आहे.सिंधू तिचा पुढील प्रवास हा ८ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आर्क्टिक ओपनमधून करणार आहे. ही स्पर्धा ८ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर पर्यत चालणार आहे.