कोलंबो – आशिया कपमधील (Asia Cup) रविवार (10 सप्टेंबर) रोजी खेळवण्यात आलेला भारत (India) आणि पाकिस्तानचा (Pakistan) यांच्यातील दुसरा सामनाही पावसामुळे अपूर्ण राहिला. आणि क्रिकेटप्रेमीचा हिरमूड झाला, तर हा सामना राखीव दिवशी म्हणजेच आज सोमवारी खेळवण्यात येणार आहे. पण या राखीव दिवशीच्या सामन्यावर देखील पावसाचं सावट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमीसह खेळाडू देखील टेन्शनमध्ये आले आहेत. रविवारी श्रीलंकेच्या क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये हायवोल्टेज अर्धवट सामना झाला. (rain on india pakistan match today how many overs will the match be on reserve day see)
पावसाची बॅटिंग…
दरम्यान, रविवारी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. पण त्यापूर्वी भारताने प्रथम फलंजाजी करत चांगली सुरुवाती करुन दिली. पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने दोन विकेटच्या मोबदल्यात २४.१ षटकात १४७ धावा फलकावर लावल्या होत्या. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी १०० चेंडूत १२१ धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने ४९ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी आक्रमक फलंदाजी करत मागील सामन्याचे उट्टे काढले. भारताच्या फलंदाजीवेळी २४.१ षटकानंतर पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली होती. पण पावसाने व्यत्यय घातला आहे. गिल याने ५२ चेंडूत ५८ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने १० चौकार लगावले. सामना थांबला तेव्हा विराट कोहली ८ आणि केएल राहुल १७ धावांवर फलंदाजी करत होते.
पाऊस आल्यास किती ओव्हर्सचा सामना
काल पावसामुळे पंचाच्या पाहणीनंतर भारतासारखीच २४ षटके खेळायला दिली जातील. या २४ षटकांमध्ये पाकिस्तानला विजयासाठी २०६ धावांचे आव्हान देण्यात येईल, असे म्हटले जात होते. पण त्यानंतर पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि हा सामना ३४ षटकांचा होईल, असे सांगितले होते. मात्र पुन्हा मैदानाची पाहणी केल्यानतर हा सामना राखीव दिवशी खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. आज हा सामना आता २४ किंवा ३६ षटकांचा होणार नाही, तर हा सामना आता पूर्ण ५० षटकांचा खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता हा सामना राखीव दिवशी पूर्ण ५० षटकांचा होणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना सोमवारी पुन्हा एकदा या सामन्याची मजा घेता येणार आहे.
सामन्यावर पावसाचे सावट
हा सामना राखीव दिवशी म्हणजेच आज सोमवारी खेळवण्यात येणार आहे. पण या राखीव दिवशीच्या सामन्यावर देखील पावसाचं सावट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमीसह खेळाडू देखील टेन्शनमध्ये आले आहेत. पण राखीव दिवशी जेव्हा खेळ सुरु होईल, तेव्हा मैदानाची काय परिस्थिती आहे, हे पाहिले जाईल आणि त्यानंतरच हा सामना सुरु केला जाईल. त्यामुळे आता सोमवारी कसे वातावरण असते हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरणार आहे.