Asim Munir Nuke threat : पाकिस्तानचा अणुब्लफ फेल? असीम मुनीरच्या धमक्या निरर्थक, तज्ज्ञ म्हणतात अणुबॉम्बची चाचणी अशक्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Asim Munir nuclear threat : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी नुकतेच वॉशिंग्टनमध्ये दिलेल्या भाषणामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. “पाकिस्तान एक अणुशक्तीशाली राष्ट्र आहे. जर आम्हाला असे वाटले की आम्ही बुडत आहोत, तर आम्ही आपल्यासोबत अर्धे जग बुडवू,” असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले. ही धमकी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच दिलेला गंभीर इशारा मानला जातो. पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आणि देशातील अस्थिर राजकीय परिस्थितीत ही धमकी अधिक चिंताजनक ठरते.
मुनीर यांनी स्वतःला “देशाचा रक्षक” म्हटले. इतिहास पाहिला तर पाकिस्तानमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी लष्करप्रमुख नेहमीच असे दावे करत आले आहेत.
१९५८ मध्ये फील्ड मार्शल अयुब खान यांनी स्वतःला रक्षक घोषित केले होते.
१९७७ मध्ये झिया-उल-हक यांनी भुट्टो सरकार उलथवून टाकल्यानंतर अल्लाहच्या मदतीने सैन्य बळकट करण्याची घोषणा केली होती.
आज पुन्हा एकदा असीम मुनीर हेच पाऊल टाकताना दिसत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पाकिस्तानात मुनीरविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यामुळे ते नियंत्रण ठेवण्यासाठी जुने न्यूक्लियर वेपन्स एनेबल्ड टेररिझम (NWET) धोरण पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करत आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की
पाकिस्तानची अर्थव्यवस्था इतकी खालावली आहे की अणुचाचण्या करणे त्यांना परवडणार नाही.
जर त्यांनी चाचणी केली तर आंतरराष्ट्रीय निर्बंध त्वरित लागू होतील.
अमेरिकेसारखे राष्ट्रही पाकिस्तानला वाचवू शकणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Switzerland IACCC : भारतीयांचा ‘काळा पैसा’ परत मिळणार? स्वित्झर्लंडचा IACCC मध्ये सामील होण्याचा भविष्यदर्शी निर्णय
भारतानेही आता साफ केले आहे की पाकिस्तानकडून येणारा अणुब्लॉकचा धोका अजिबात सहन केला जाणार नाही. मुनीरची ही धमकी ही भारताला घाबरवण्यापेक्षा स्वतःच्या जनतेला भुलवण्यासाठीची खेळी आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानमध्ये ‘अणुशक्ती’चा विषय हा नेहमीच जनतेला अफू देऊन झोपवण्याचे हत्यार ठरले आहे.