RCB चे एक पाऊल पुढे!(फोटो-सोशल मीडिया)
Bangalore stampede : ३ जून रोजी झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी दणदणीत पराभव करून पहिले आयपीएल विजेतपद जिंकले. १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीने ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांकडून आनंद साजरा करण्यात आला आहे. यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचताच चाहत्यांची झुंबड उडाली आणि गर्दी अनियंत्रित होऊन एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आता त्या पाठोपाठआता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.
धवार, ४ जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडून ११ जणांचा मृत्यू झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आरसीबी संघाकडून हे एक कौतुकास्पद पाऊल टाकण्यात आल्याचे मानले जात आहे. १७ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीने आयपीएल २०२५ ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचल होता. संघ विजयी आनंद साजरा करत असताना आपल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी चाहत्यांची ४ चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर गर्दी जमली होती. यादरम्यान, पावसामुळे गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. ज्यामुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी, ३३ हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अपघाताबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच ते म्हणाले की, क्रिकेट असोसिएशनने परिस्थिती हाताळायला हवी होती. स्टेडियममध्ये फक्त एक छोटासा गेट उघडा होता, जिथे मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. गर्दी वाढताच लोकांनी जबरदस्तीने दरवाजा तोडला, ज्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली.
𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁: 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝘂𝗿𝘂
The unfortunate incident in Bengaluru yesterday has caused a lot of anguish and pain to the RCB family. As a mark of respect and a gesture of solidarity, RCB has announced a financial… pic.twitter.com/C50WID1FEI
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 5, 2025
हेही वाचा : IND Vs ENG : भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर! वाचा कुणाला संधी अन् कुणाला डच्चू..
एम. चिन्नास्वामी येथे झालेल्या सात जणांच्या मृत्यूवर आयपीएल अध्यक्षांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हा कार्यक्रम भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा आयपीएलकडून आयोजित करण्यात आलेल नव्हता. त्यांनी सांगितले की हा आरसीबीचा खाजगी कार्यक्रम होता.