पाकिस्तानचा मोहम्मद आमिर पुन्हा बरळला (फोटो सौजन्य - Instagram)
या खेळानंतरही आमिर आपल्या मागील भूमिकेवर ठाम राहिला आहे. यापूर्वी अभिषेक शर्माबद्दल विविध टिप्पण्या करणाऱ्या आमिरने आता टीम इंडियाबद्दल एक विचित्र विधान केले आहे. पुन्हा एकदा आमिरने भारताविरूद्ध विधान करत गरळ ओकली आहे. मात्र यावेळी अनेक जण त्याच्यावर संतापले आहेत.
PAK vs SL: ‘इनसे न हो पाई…’ सेहवागचा पाकिस्तानला टोमणा, सेमीफायनलमध्ये येण्यासाठी मार्गही सांगितला
भारत पात्र ठरणार नाही – आमिर
मोहम्मद आमिरने पुन्हा एकदा भारताविरूद्ध विधान केले आहे . मोहम्मद आमिरच्या मते टीम इंडिया टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणार नाही. आमिरने एका कार्यक्रमात म्हटले होते की, “पाकिस्तान पात्र ठरेल. पहा, पाकिस्तान ते करतो की नाही, भारत नाही.” त्याच्या या हास्यास्पद विधानाने शोच्या सूत्रसंचालकालाही आश्चर्यचकित केले होते. पाकिस्तानचा सामना आज श्रीलंकेविरूद्ध असून त्यांचीही करो वा मरो अशीच स्थिती आहे. मात्र मोहम्मद आमिरच्या मते भारत सुपर ८ मधून बाद होईल आणि पाकिस्तान मात्र उपांत्य फेरीत पोहचेल. यामुळे भारतीय चाहते मोहम्मद आमिरला ट्रोल करत आहेत.
अभिषेक शर्माला म्हटले स्लॉगर
अमिरने यापूर्वी तरुण भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला फक्त स्लॉगर असल्याचे म्हटले होते आणि तेव्हापासून तो भारतीय चाहत्यांचे लक्ष्य बनला आहे. आमिरचा असा विश्वास आहे की दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ भारतापेक्षा खूपच चांगले क्रिकेट खेळत आहेत. तथापि, अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्धच्या पुढच्याच सामन्यात दमदार अर्धशतक झळकावून आमिरचे तोंड बंद केले. अभिषेकचा फॉर्म पहिल्या ३-४ सामन्यात खराब असला तरीही झिम्बाब्वेविरूद्ध त्याने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे.
PAK vs SL Live: आज करो या मरो! Sri Lanka करणार पाकिस्तानविरुद्ध प्रथम गोलंदाजी
वेस्ट इंडिजविरुद्ध ‘करो वा मरो’चा सामना
गट १ मधील संपूर्ण समीकरण आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील करा किंवा मरण्याच्या सामन्यावर अवलंबून आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम चारमध्ये प्रवेश करेल. सध्या, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले स्थान निश्चित केले आहे. जर भारत जिंकला तर त्यांचा सामना १ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी होईल.






