इंग्लंड टीम(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जून पासून सुरवात होणार आहे. पहिला सामना २० जूनपासून खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. २० जूनपासून मालिकेला सुरवात होत असून या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ३१ जुलैपासून खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघात १४ खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. या दरम्यान संघात अनेक वरिष्ठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
भारताविरुद्धच्या इंग्लंड कसोटी संघाची धुरा बेन स्टोक्सकडे सोपवण्यात आली आहे. त्याच वेळी, गस अॅटकिन्सनला दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. संघात वेगवान गोलंदाजीची जबाबदारी ब्रायडन कार्स, जेकब बेथेल आणि ख्रिस वोक्स यांच्याकडे दिली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी दौऱ्यात या तिन्ही गोलंदाजांनी शेवटची कसोटी डिसेंबरमध्ये खेळली होती. त्याच वेळी, जून २०२२ मध्ये हेडिंग्ले येथे न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कॅप मिळाल्यानंतर जेमी ओव्हरटन संघात अनुपस्थित राहिला होता. आता त्याला भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत स्थान मिळाले आहे.
Series Loading : ◼◼◼◻ Who is the first name in your XI? 🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/YxUeU4Vv3z — England Cricket (@englandcricket) June 5, 2025
बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, जॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जोश टंग, जेमी ओव्हरटन, ख्रिस वोक्स.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ मे रोजी झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाबचा ६ धावांनी पराभव करत पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. बुधवारी या विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी आरसीबी संघ बंगळुरूला रवाना झाला. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आपल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. आता आरसीबीचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने देखील भावुक पोस्ट शेअर करून तो पूर्णपणे तुटल्याचे बोलला आहे.