रजत पाटीदार(फोटो-सोशल मीडिया)
MI vs RCB : काल वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात सामना रंगला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला १२ धावांनी धूल चारली. एमआयला त्यांच्याच घरच्याच मैदानावर पराभूत करून आरसीबीने मोठा पराक्रम केला आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २२१ धावांचे लक्ष्य मुंबईसमोर ठेवले होते. प्रतिउत्तरात मुंबई लक्ष्याचा पाठलाग करताना २०९ धावाच करू शकली. आयपीएल २०२५ च्या हंगामात आरसीबीचा हा तिसरा विजय ठरला. या विजयानंतर देखील बीसीसीआयने आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारला दंड ठोठावला आहे.
वानखेडे स्टेडीयमवर मुंबई विरुद्ध आरसीबी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला. आरसीबीने मुंबईयासमोर २२२ धावांचे लक्ष्य दिले होते. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघाने चांगला खेळ करून मुंबई इंडियन्सला पराभूत केले. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शानदार विजयानंतर देखील रजत पाटीदार अडचणीत आला आहे. ज्यामुळे बीसीसीआयने कठोर पाऊल उचलत कारवाई केली आहे. बीसीसीआयकडून मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार यांच्या संघाने स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला. आयपीएल मीडिया म्हटले आहे की, ‘आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, या हंगामात त्याच्या संघाचा हा पहिलाच गुन्हा असल्याने, पाटीदारला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.’
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने मुंबईविरुद्ध ३२ चेंडूत ६४ धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. परंतु, पाच वेळा आयपीएल विजेत्या संघाविरुद्धच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कृणाल पंड्याने जिगरबाज गोलंदाजी केली. त्याच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. उल्लेखनीय बाब अशी की, आरसीबीचा मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडेवरील विजय हा या मैदानावर १० वर्षांत पहिलाच विजय होता.
मुंबई इंडियन्स : विल जॅक, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), नमन धीर,हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल.