फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रोहन बोपण्णा आणि अल्दिला सुतजियादी : अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या यू.एस.ओपन स्पर्धेमध्ये भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि इंडोनेशियाची अल्दिला सुतजियादी हे सध्या दमदार फॉर्ममध्ये आहेत. काल म्हणजेच २ सप्टेंबर रोजी यू.एस.ओपनचा क्वार्टर फायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये रोहन बोपण्णा आणि अल्दिला सुतजियादीच्या जोडीने दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. २ सप्टेंबर रोजी, त्यांनी मॅथ्यू एब्डेन आणि बार्बोरा क्रेज्सिकोव्हा यांचा 7-6 (7-4), 2-6, 10-7 असा एक तास 33 मिनिटांत कोर्ट 5 वर पराभव केला. आता त्यांचा पुढील सामना अमेरिकन जोडीशी होणार आहे.
It is incredible Result!
How Rohan Bopanna 🇮🇳 does this daily 🫠🤤!
This Man 🫡🫡
The MAN ,The MYTH ,The Legend
BOPANNA/🇮🇩SUTJIADI ENTER US OPEN SEMIS 🔥🔥🔥➡️ The 8th seeds beat their 4th seeded opponents 🇦🇺Ebden/🇨🇿Krejcikova 7-6(4) 2-6 10-7
Looks like Bopanna has decided… pic.twitter.com/4H2DKIJtP1— Navin Mittal (@Navinsports) September 2, 2024
भारताचा ४२ वर्षीय रोहन बोपण्णा सध्या दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याच्या यू.एस.ओपनच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने मेन्स डबल्समध्ये सुद्धा भाग घेतला होता परंतु. मॅथ्यू एब्डेन आणि रोहन बोपण्णा या जोडीला राउंड ऑफ १६ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर सध्या रोहन बोपण्णाची मिक्स डबलमध्ये जोडी इंडोनेशियाच्या अल्दिला सुतजियादी सोबत आहे. ही जोडी सध्या स्पर्धेमध्ये कहर करत आहे. सेमीफायनलमध्ये त्यांच्या कामगिरीवर बोलायचं झालं तर बोपण्णा-सुतजियादी यांनी तिसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये 6-0 अशी जबरदस्त आघाडी घेत खळबळजनक प्रदर्शन केले.
रोहन बोपण्णा आणि अल्दिला सुतजियादीच्या जोडीचा पुढील उपांत्य फेरीचा सामना अमेरिकन जोडी टेलर टाउनसेंड आणि डोनाल्ड यांग यांच्याशी होणार आहे. 44 वर्षीय बोपण्णाने आधीच डेव्हिस चषकातून निवृत्तीची घोषणा केली आहे आणि जानेवारी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपद डिफेन्ड करण्यासाठी तो परत येईल की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.