क्रिकेटच्या मैदानात पंचांकडे असणाऱ्या 'या' पाच उपकरणांची तुम्हाला माहिती आहे का? (Photo Credit- X)
मैदानावरील पंचांच्या हातात असलेले सर्वात छोटे पण महत्त्वाचे साधन म्हणजे ‘अंपायर काउंटर’. याद्वारे पंच टाकलेले चेंडू, झालेली षटके आणि पडलेल्या विकेट्सचा अचूक हिशोब ठेवतात. उदाहरणार्थ, एखादी विकेट पडल्यानंतर पंच बाजूचा डायल फिरवतात, ज्यामुळे काउंटर शून्यावरून एकावर सरकतो. यामुळे मानवी चुकीमुळे स्कोअरमध्ये गोंधळ होण्याची शक्यता कमी होते.

Photo Credit – X
सामन्यादरम्यान चेंडू वारंवार जमिनीवर आदळल्यामुळे त्याचा आकार खराब होण्याची शक्यता असते. अशा वेळी ‘बॉल गेज’चा वापर केला जातो. यामध्ये दोन जोडलेल्या रिंग असतात एक किमान व्यासाची आणि दुसरी कमाल व्यासाची. जर चेंडू लहान रिंगमधून सहज बाहेर पडला किंवा मोठ्या रिंगमध्ये अडकला, तर त्याचा आकार बदलला आहे असे मानून तो त्वरित बदलला जातो.

Photo Credit- X
बॅटची रुंदी, जाडी आणि टोकाकडील भागाची (Edges) जाडी आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार असणे बंधनकारक आहे. एखादी बॅट मर्यादेपेक्षा जास्त जाड किंवा रुंद नाही ना, हे तपासण्यासाठी पंच बॅट गेजचा वापर करतात. बॅट या गेजमधून आरपार जाणे आवश्यक असते.

Photo Credit- X
क्रिकेटमध्ये स्टंपची एकूण रुंदी बरोबर 9 इंच असणे आवश्यक असते. खेळपट्टी तयार करताना स्टंप्ससाठी जमिनीत योग्य अंतरावर छिद्रे पाडण्यासाठी स्टंप गेजचा वापर केला जातो. यामुळे स्टंप्समधील अंतर आणि त्यांची मांडणी नियमानुसार असल्याची खात्री पटते.

Photo Credit- X
कसोटी सामन्यांमध्ये खराब हवामानाचा किंवा कमी प्रकाशाचा खेळावर मोठा परिणाम होतो. अशा वेळी पंच ‘लाईट मीटर’चा वापर करून प्रकाशाची तीव्रता ‘लक्स युनिट्स’मध्ये मोजतात. जर प्रकाश खेळण्यासाठी अपुरा आणि खेळाडूंसाठी असुरक्षित असेल, तर पंच सामना स्थगित करण्याचा किंवा मैदानावरील फ्लडलाईट्स सुरू करण्याचा निर्णय घेतात. क्रिकेटमधील हे तांत्रिक बारकावे खेळ अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध बनवण्यास मदत करतात.

Photo Credit- X






