Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Captain Rohit Sharma : रोहित शर्मावर संघ व्यवस्थापन नाराज; IPL 2025 नंतर कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेणार..

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपदही आपल्या नावे केले. त्यानंतर तो कसोटी संघात कर्णधारपदी कायम राहणार असल्याचे मानले जात आहे. निवडकर्त्यांकडून निर्णय येणे बाकीय आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 16, 2025 | 09:20 PM
Captain Rohit Sharma: Team management upset with Rohit Sharma; Will take a big decision regarding captaincy after IPL 2025.  

Captain Rohit Sharma: Team management upset with Rohit Sharma; Will take a big decision regarding captaincy after IPL 2025.  

Follow Us
Close
Follow Us:

Rohit Sharma : सध्या भारताच्या यशस्वी  कर्णधारांमध्ये रोहित शर्माचे नाव घेतले जाऊ लागले आहे.  गेल्या तीन वर्षांत त्याने टीम इंडियाचा स्तर खूप उंचावला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. यानंतर भारताने 2024 साली T20 विश्वचषक जिंकला आणि त्याच वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपदही आपल्या नावे केले. त्यानंतर तो कसोटी संघात कर्णधारपदी कायम राहणार असल्याचे मानले जात आहे. पण टीम इंडियाच्या निवडकर्त्यांकडून 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

रोहितची कसोटीत खराब कामगिरी..

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अलीकडेच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून 3-1 ने पराभवाचा सामना करावा लागला. याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील संघाचा पराभव झाला होता. यानंतर भारतीय संघासाठी डब्ल्यूटीसीच्या मार्गावर इंग्लंडविरुद्ध मालिका होणार आहे.

हेही वाचा : PM Narendra Modi : ‘मी त्यात तज्ञ..’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारत-पाकिस्तान क्रिकेटबाबत धमाकेदार प्रतिक्रिया

पीटीआयच्या रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘तांत्रिकदृष्ट्या रोहित शर्मा इंग्लंड मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार आहे. सिडनी कसोटीत त्याने स्वतःला सामन्यापासून दूर ठेवले होते, जिथे त्याने सर्वांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की संघाला खराब फॉर्ममध्ये असलेल्या अनेक फलंदाजांसह खेळत राहणे योग्य ठरणार नाही.’

यानंतर बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, ‘ऑस्ट्रेलिया कसोटीनंतर भारताने एकही कसोटी सामना खेळलेला नाही, त्यामुळे कसोटी कर्णधारपदात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच, रोहितने देखील कधीही असे म्हटले नाही की त्याला कसोटी क्रिकेट खेळायचे नाही.’

तसेच तो तो म्हणाला की, ‘आयपीएलदरम्यान निवड समितीला सुट्टी मिळते. त्यामुळे साहजिकच सर्व सामने टेलिव्हिजनवर दाखवले जात असल्याकारणाने त्यांना  नेहमी प्रवास करण्याची गरज भासत नसते. जोपर्यंत त्यांच्याकडे विशिष्ट रणनीती नसेल किंवा एखाद्या विशिष्ट खेळाडूला जवळून पाहायचे नसेल तर ते प्रवास करत नाहीत.’

हेही वाचा : IPL 2025 : इशान किशन निळ्या जर्सीत परतणार? सनरायझर्स हैदराबाद करणार मदत, स्फोटक खेळी ठोकला दावा..

कसोटी कर्णधारपदाची माळ बुमराहच्या गळ्यात?

भारतीय संघ व्यवस्थापन भविष्यातील योजनांवर लक्ष ठेवून आहे. सध्या, व्यवस्थापन भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला भावी कसोटी कर्णधार म्हणून विचारात करत आहे. पण बुमराहचा फिटनेस हा एक महत्वाचा  मुद्दा बनला आहे. दुसरीकडे, रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा स्वत:ला सिद्ध केले आहे.

प्रशिक्षक गौतम गंभीरचा निर्णयाकडे असेल लक्ष..

आयपीएलदरम्यान संघ व्यवस्थापन इंग्लंड दौऱ्यासाठी खेळाडूंच्या निवडीचा विचार करणार सल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत गौतम गंभीरचा निर्णय देखील महत्त्वाचे ठरणार आहे. गंभीरचा सध्याच्या फॉर्मवर खूप विश्वास आहे याची माहिती सर्वांना आहे. आता प्रशिक्षकाच्या दृष्टीने रोहित शर्मा या दौऱ्यासाठी फिट होतो की नाही? हे बघणे रंजक ठरणार आहे.

 

 

Web Title: Rohit sharma is likely to lose the captaincy as the team management is unhappy with him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 09:20 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • bcci
  • Captain Rohit Sharma
  • Champions Trophy 2025
  • ICC
  • IPL 2025

संबंधित बातम्या

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
1

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
2

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?
3

Asia cup 2025 साठी शुभमन गिलची थेट उपकर्णधारपदी वर्णी; आकडेवारी काही वेगळच सांगते, संघात स्थान देण्यामागील कारण काय?

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
4

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.