PM Narendra Modi : 'मी त्यात तज्ञ..', पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारत-पाकिस्तान क्रिकेटबाबत धमाकेदार प्रतिक्रिया(फोटो-सोशल मीडिया)
PM Narendra Modi : नुकतीच भारताने चॅम्पियन ट्रॉफी विजेतेपद आपल्या नावे केले आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद हे पाकिस्तानकडे होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारताचे सर्व सामाने हे दुबईत खेळवण्यात आले होते. या स्पर्धेदरम्यान भारताने साखळी सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक राहिली त्यामुळे त्यांना साखळी सामन्यातून बाहेर जावं लागलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधाबाबत सर्वच परिचित आहे. त्यांच्या संबंधाबाबत अनेक जण व्यक्त होत असतात. अशातच भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावर जास्त व्यक्त न होता दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांमध्ये कोणता संघ वरचढ आहे.
पॉडकास्टद्वारे प्रसिद्ध असलेलेल सुप्रसिद्ध अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रीडमन यांच्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी भारत-पाकिस्तान क्रिकेटबद्दल त्यांचे विचार व्यक्त केले. या मुलाखतीत फ्रीडमनकडून क्रीडा आणि विशेष करून भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावर पंतप्रधान मोदी व्यक्त हॉट म्हणाले की, खेळामध्ये ऊर्जा भरावी लागते आणि मी त्याकडे मानवी विकासाचे एक रूप म्हणून पाहतो. खेळाची बदनामी होत असेल तर ती बघू नये. असे देखील मोदी म्हणाले.
हेही वाचा : IPL 2025 : इशान किशन निळ्या जर्सीत परतणार? सनरायझर्स हैदराबाद करणार मदत, स्फोटक खेळी ठोकला दावा..
मोदी यांना भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणता संघ चांगला आहे? हा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, ‘कोण चांगले किंवा कोण वाईट, मी खेळाच्या तंत्राबद्दल सांगू शकत नाही, मी त्यात तज्ञ नाही, ज्यांना ते माहित आहे तेच याबद्दल सांगू शकतात. पण काही निकाल दाखवत असतात, जसे की काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बघा. निकाल सांगतो की कोणता संघ चांगला आहे. असे मोदी यांनी उत्तर दिले.
हेही वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची बीसीसीआयविरोधात ‘विराट’ डरकाळी; खेळाडूंसाठीचे नियम चुकीचे, आवाज उठवणार..
भारताने न्यूझीलंड संघाचा 4 विकेटने पराभव करून 12 वर्षांतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या विजयाने भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. भारताने 9 महिन्यांत सलग दुसऱ्यांदा ICC ट्रॉफी जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला असून त्याने एकही सामना गमावला नाही. शेवटच्या सामन्यात भारताने सर्वोच्च कामगिरी करत विजयी ट्रॉफी उंचावली आहे.