फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru सोशल मीडिया
The reason for Royal Challengers Bangalore’s green jersey : आरसीबी संघ आज राजस्थान रॉयल्सशी सामना करत आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाणारा हा आयपीएल २०२५ चा २८ वा सामना आहे. मागील सामने दोन्ही संघानी गमावले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरतील. पण या सामन्यात आरसीबी संघ हिरवी जर्सी घालून मैदानात उतरला. प्रत्येक हंगामात असे दिसून येते की आरसीबी संघाचे खेळाडू किमान एका सामन्यात हिरवी जर्सी घालताना दिसतात.आज पाचव्यांदा आरसीबी त्यांच्या घरच्या मैदानाबाहेर ही हिरवी जर्सी घालून खेळताना दिसत आहे.
कोविड-१९ मुळे इतर ठिकाणी झालेल्या २०२०, २०२१, २०२२ हंगामातील सामन्यांमध्ये आरसीबीने ही हिरवी जर्सी परिधान केली होती. काही कारणास्तव, त्याने २०२४ च्या हंगामातही त्याच्या घरच्या मैदानावर ही जर्सी घातली नव्हती. यावेळीही तेच घडले आहे. अशा परिस्थितीत, ही हिरवी जर्सी घालण्याचे कारण जाणून घेऊया. खरंतर, आज आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा आरसीबी संघ हिरव्या जर्सी (आरसीबी ग्रीन जर्सी) घालून राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना खेळत आहे .
२०११ च्या हंगामापासून आरसीबी संघ दरवर्षी एका सामन्यात हिरवी जर्सी घालत आहे. यामागील उद्देश म्हणजे लोकांना झाडे लावण्यासाठी आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी जागरूक करणे. या उपक्रमांतर्गत, आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल) संघ दरवर्षी सामन्यात पुनर्वापर केलेल्या जर्सी घालतो आणि नाणेफेकीच्या वेळी विरोधी संघाच्या कर्णधाराला एक वनस्पती भेट देतो. आज जयपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२५ च्या २८ व्या सामन्यातही असेच घडले, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar Green Jersey IPL) ने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला एक रोप भेट दिली.
RETURN RECYCLE REPEAT: Our Commitment to Sustainability ♻️
All RCB jerseys are made of 95% textile and polyester waste, and can be recycled several times without losing quality, through Puma’s ReFibre Fabric.#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2025 #RRvRCB pic.twitter.com/vZuhipipkP
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 13, 2025
आरसीबी संघाने आतापर्यंत हिरव्या जर्सीमध्ये एकूण १४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना फक्त ४ वेळा विजय मिळाला आहे, तर २०१५ मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. हिरव्या जर्सीमध्ये खेळलेल्या १४ सामन्यांपैकी त्यांनी ४ जिंकले आहेत, ९ गमावले आहेत आणि १ सामना अनिर्णीत राहिला आहे. गेल्या वर्षी, ग्रीन जर्सीमध्ये आरसीबीला कोलकाता नाईट रायडर्सकडून ३ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आरसीबीने २०११ मध्ये हिरव्या जर्सीमध्ये पहिला आयपीएल सामना कोची टस्कर्स केरळ विरुद्ध खेळला होता, ज्याचा त्यांनी ९ गडी राखून पराभव केला होता.