फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore toss update : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. यामध्ये राजस्थानचा संघ संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणार आहे तर बंगळुरूच्या संघ रजत पाटीदाराच्या नेतृत्वात खेळताना दिसेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघांना मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे आजचा सामन्यात विजय मिळवून या स्पर्धेत पुन्हा कमबॅक मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. आजचा सामना सवाई मानसिंह स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.
आजच्या सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलूरूच्या संघामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही, तर राजस्थान रॉयल्सच्या संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे. फजलहक फारुकीला आज प्लेइंग ११ मधून बाहेर काढले आहे त्याच्या जागेवर वाणिदु हंसरंगा यांना संघामध्ये स्थान मिळाले आहे.
राजस्थान रॉयल्सच्या संघाने या स्पर्धेमध्ये फार चांगली सुरुवात झाली नव्हती संघाने पहिले सुरुवातीचे दोन सामने गमावले होते त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करून या स्पर्धेचा पहिला विजय नावावर केला होता. सध्या पॉईंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स संघ चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने या स्पर्धेमध्ये धमाकेदार सुरुवात केली होती सलग सामन्यांमध्ये विजय मिळवून संघाने त्यांचा जोर दाखवला होता पण मागील दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. बंगळुरूचा संघ गुणतालिकेमध्ये सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
🚨 News from Jaipur 🚨@RCBTweets won the toss and elected to bowl against @rajasthanroyals in Match 28.
Updates ▶️ https://t.co/rqkY49M8lt#TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/i7ZipViC6C
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
आयपीएलच्या इतिहासात राजस्थान आणि बंगळुरू यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर, आतापर्यंत या दोघांमध्ये एकूण ३२ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने १५ सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्सने १४ सामने जिंकले आहेत. याशिवाय, ३ सामने अनिर्णीत राहिले. जर आपण पाहिले तर आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये तीव्र स्पर्धा झाली आहे.
रजत पाटीदार (विकेटकिपर), विराट कोहली, फिल्ल सॉल्ट, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकिपर), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, यश दयाल, सुयश शर्मा
संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), नितीश राणा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, वानिंदू हसरंगा, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.