बाबर आझम आणि रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : भारत या वर्षी आशिया कप २०२५ स्पर्धेचे आयोजन करणार आहे. ही स्पर्धा २०२५ या वर्षी सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. या स्पर्धेला अजून तीन महिने शिल्लक असून या स्पर्धेबद्दल अद्याप फारसे काही निर्णय घेण्यात आलेले नाही. त्याआधी आशियातील संघ खूप व्यग्र असणार आहेत. काही दिवसांपूर्वी अधिकृत प्रसारक सोनीकडून एक पोस्टर देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. भारत, बांगलादेश आणि श्रीलंका संघांचे कर्णधार या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले होते. मात्र, यावर पाकिस्तानच्या कर्णधारचा फोटो नव्हता. त्यावरून पाकिस्तानमध्ये गदारोळ माजला होता.
यापूर्वी आशिया कप स्पर्धेबद्दल काही गोष्टी स्पष्ट झाल्या नव्हत्या. यामध्ये स्पर्धेची सुरुवात आणि पाकिस्तानसोबतच्या सामन्याची तारीख कोणती याबाबत स्पष्टता नव्हती. पण, आता अहवालात असे म्हटले जात आहे की, ही स्पर्धा या वर्षी सप्टेंबरमध्ये खेळवली जाणार आहे. त्याच वेळी, काही न्यूज साइट्स भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल देखील बोलताना दिसत आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ७ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, आशिया कप २०२५ ही स्पर्धा ५ सप्टेंबरपासून सुरू होईल होणार असल्याचेही या वृत्तात सांगण्यात आले आहे. . त्याचबरोबर स्पर्धेचा अंतिम सामना २१ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. एकूणच, ही स्पर्धा १७ दिवस खेळवली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा : ऋषभ पंत सुसाट! ICC Test Rankings मध्ये घेतली मोठी झेप; जो रूट पहिल्या स्थानावर कायम..
तसेच स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, आशिया कप २०२५ बाबत सर्व चित्र अद्याप समोर आलेले नाही. आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर न झाल्यामुळे प्रायोजक आणि मीडिया पार्टनर देखील नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत आशियाई क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, आशिया कपचे वेळापत्रक जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात यावे.
भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताला इंग्लंडकडून ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे. आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळणार आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत हा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.