राष्ट्रकुल स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) अकराव्या दिवशी बॅडमिंटन (Badminton) पुरुष दुहेरीच्या संघाने अंतिम सामन्यात कमाल खेळाचे प्रदर्शन करत भारताला (India) भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताच्या सात्विक-चिराग या जोडीने बॅडमिंटनमध्ये इंग्लंडला नमवून विजय संपादन केला आहे.
बर्लिंगहम येतेच सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टीने (Satwik Sairaj Rankireddy and Chirag Chandrashekhar Shetty) इंग्लंडच्या के बेन लेन आणि सीन वेन्डी यांचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करून दाखवले असून भारतासाठी आतापर्यंत ५९ पदकं जिंकली आहेत.
HISTORY CREATED- DYNAMIC DUO ON A ROLL?
? @satwiksairaj / @Shettychirag04 are VICTORIOUS over their English opponents with a score of 0-2 at the #CommonwealthGames2022?
This is the 1️⃣st ever Indian Men's Doubles Badminton ? Medal in the #CWG?
Brilliant Feat! #Cheer4India pic.twitter.com/xR9Cr9bx5x
— SAI Media (@Media_SAI) August 8, 2022
लक्ष्य सेनची ही सुवर्ण कामगिरी :
स्पर्धेच्या अकराव्या दिवशी सात्विक-चिराग सह भारताचा २० वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने देखील (Lakshya Sen) पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याने मलेशियाच्या के एंग जे यॉन्ग (Tze Yong Ng) याला मात देत विजय मिळवला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात सेननं तीन पैकी दोन सेट जिंकत१९-२१, २१-९, २१-१६ च्या फरकाने सामना जिंकला आहे.