शाहरुख खान(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 च्या 18 व्या मोसमाचा थरार आजपासून सुरू होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. क्रिकेटप्रेमी पहिल्या सामन्याकडे लक्षठेवून आहेत. पहिला सामना कोलकात्यामधील ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. त्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स ही दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. तत्पूर्वी केकेआर संघांचा मालक शाहरुख खानने आपल्या संघाला काही टिप्स दिल्या आहेत. ‘चक दे इंडिया’ चित्रपटामध्ये ज्या भूमिकेत शाहरुख खानन वावरताना दिसला अगदी त्याचप्रमाणे तो प्रत्यक्षात करताना दिसून आला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
सिनेमामध्ये शाहरुख खान सामन्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्याच्या शब्दांत भारतीय महिला हॉकी संघाला प्रेरित करतो. अगदी त्याचप्रमाणे, त्याने आरसीबी विरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याच्या आयपीएल संघ केकेआरचा तो जयजयकार करताना दिसून आला आहे. शाहरुख खानला ते ही भूमिका वठवतान बघून सहाजिकच ‘चक दे इंडिया’ मधील तो सीन आठवणे क्रमप्राप्त होऊन जाते.
शाहरुख खान केकेआरच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहचून तो नवीन खेळाडूंना भेटला. त्याला फ्रँचायझीमध्ये त्या नवीन खेळाडूंचे स्वागत करायचे होते. त्यांनी संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे आभारही मानले. शाहरुख खानने संघाचा नवीन कर्णधार अजिंक्य रहाणेचे नाव घेत त्याचे अभिनंदन देखील केले. शाहरुख खानने म्हणाला की, ‘सर्वांनी निरोगी आणि आनंदी राहावे.’ ड्रेसिंग रूममध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबतचा शाहरुख खानच्या या संभाषणाचा व्हिडिओ केकेआर फ्रँचायझीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. त्यानंतर तो प्रचंड व्हायरल होत आहे.
𝐊𝐢𝐧𝐠 𝐊𝐡𝐚𝐧 𝐤𝐚 𝐩𝐲𝐚𝐚𝐫, 𝐊𝐧𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐤𝐞 𝐧𝐚𝐚𝐦 💜 pic.twitter.com/mx2EkNHLdT
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 22, 2025
हेही वाचा : पहिल्या सीझनपासून आयपीएल खेळणारे 9 प्लेयर्स, 3 खेळाडूंच्या हातात अद्याप एकही ट्रॉफी
आयपीएल 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स पहिला सामना गतविजेता म्हणून खेळणार आहे. आयपीएलमधील एकूण कामगिरीबद्दल सांगायचे जाहले तर, केकेआर आणि आरसीबी हे एकूण 34 वेळा आमने सामने आले आहेत. त्या 34 सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 20 वेळा विजय प्राप्त केला आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 सामने आपल्या नावे केले आहेत. आता ही दोघे संघ आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. तेव्हा तो त्यांच्यातील 35 सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार ही पाहणं रंजक ठरणार आहे.