अजिंक्य रहाणे(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा थरार आजपासून सुरू होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. क्रिकेटप्रेमी पहिल्या सामन्याकडे लक्ष देऊन आहेत. या सामन्यापूर्वी केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत असे काही घडले आहे की ते बघून आणि ऐकून हसायाल येईल. खरं तर तो टीमचा निष्काळजीपणा म्हणता येईल.
केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.
ईडन गार्डन्सवर सराव केल्यानंतर, जेव्हा कोलकाता संघाचे खेळाडू बसमध्ये हॉटेलमध्ये परतू लागले होते, तेव्हा केकेआर बस स्वतःच्या कर्णधाराला मागे सोडून परतू लागली होती. त्यानंतर रहाणेने बस पकडण्यासाठी बॅट हातात घेऊन धावण्यास सुरुवात केली. राहणेचा हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर आता चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला देखील सुरवात केली आहे.
KKR team bus leaving without their captain Rahane 😭😭 pic.twitter.com/j9GjlqyKcl
— Pick-up Shot (@96ShreyasIyer) March 21, 2025
आज आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले होते. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
उल्लेखनीय बाब अशी की, गेल्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स विजेता संघ ठरला होता. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी अनुभवी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असणार आहे. आजच्या सामन्यात, केकेआर आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यसाथी प्रयत्नशील असणार आहे.
आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.
फिल साल्ट (विकेटकीपर), विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल/टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार
सुनील नारायण, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर , रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन/अॅनरिच नोर्टजे, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा.