फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
टीम इंडियाची त्रिकोणी मालिका : भारतीय महिला संघ महिला प्रीमियर लीग २०२५ च्या या सीझनमध्ये सध्या व्यस्त आहेत. त्याचबरोबर जगभरामध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलच्या सामन्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता भारताचा संघ ९ मार्च रोजी फायनलचा सामना खेळणार आहे. त्यानंतर काही दिवस भारतीय पुरुष संघाला विश्रांतीसाठी वेळ मिळणार आहे. तर महिला प्रीमियर लीगचा फायनलचा सामना १५ मार्च रोजी खेळवला जाणार आहे त्यानंतर भारतीय महिला खेळाडूंना काही वेळ विश्रांतीसाठी मिळणार आहे.
महिला विश्वचषक या वर्षाच्या शेवटी खेळवला जाणार आहे परंतु अजुनपर्यत या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. सर्व देशांनी यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. एप्रिलच्या अखेरीस ते मे पर्यंत, ते तिरंगी एकदिवसीय मालिका आयोजित करतील ज्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ देखील सहभागी होणार आहेत. ही मालिका २७ एप्रिलपासून सुरू होईल आणि या स्पर्धेचा अंतिम सामना ११ मे रोजी खेळवला जाणार आहे.
Sri Lanka, India, and South Africa will play a One-Day Tri-Nation series during the months of
April–May in Colombo.#sportspavilionlk #danushkaaravinda #SLvsIND #SLvsSA #INDvsSA #TriNationSeries pic.twitter.com/nzjmra71AB— DANUSHKA ARAVINDA (@DanuskaAravinda) March 6, 2025
महिला एकदिवसीय विश्वचषकाआधी महिला संघाच्या तयारीसाठी ही मालिका खूप महत्वाची असणार आहे. यामध्ये संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीची नजर असणार आहे त्यावरून संघातील खेळाडूंची निवड केली जाईल. स्पर्धेच्या फॉरमॅटबद्दल बोलायचं झालं तर सर्व संघ या स्पर्धेमध्ये चार सामने खेळणार आहेत म्हणजेच प्रत्येक संघासोबत दोन सामने खेळण्याची संधी संघाला मिळणार आहे. त्यानंतर जे संघ गुणतालिकेमध्ये टॉप २ मध्ये असतील त्या संघाला अंतिम सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा श्रीलंकेतील प्रसिद्ध आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.
भारताचा सामना २९ एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. ही मालिका दक्षिण आफ्रिकेसाठी विशेषतः महत्त्वाची असेल कारण त्यामुळे त्यांना आशियातील परिस्थितीशी जुळवून घेण्याची चांगली संधी मिळेल.