Shoaib Akhtar : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एकापेक्षा जास्त महान खेळाडूंची निवड करून त्याची सर्वोत्तम आयपीएल प्लेइंग इलेव्हन बनवली आहे. शोएब अख्तरने या संघाचा कर्णधार म्हणून अनुभवी भारतीय स्टारची निवड केली आहे. शोएब अख्तरने स्पोर्ट्सकीडा च्या यूट्यूब चॅनेलवर त्याचे सर्वकालीन आवडते आयपीएल 11 निवडले आहे.
शोएब अख्तरने ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांना सलामीचा जोडीदार म्हणून निवडले आहे. शोएब अख्तरने विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आणि एबी डिव्हिलियर्सला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवडले आहे.
शोएब अख्तरने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची 5व्या क्रमांकावरील फलंदाजासाठी निवड केली आहे. त्याचबरोबर टी-20 क्रिकेटचा मास्टर किरॉन पोलार्डला सहाव्या क्रमांकावर संधी देण्यात आली आहे.
शोएब अख्तरने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) 7व्या क्रमांकावरील फलंदाजासाठी निवडला आहे. शोएब अख्तरने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये महेंद्रसिंग धोनीकडे यष्टिरक्षण आणि कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
शोएब अख्तरने भारताचा महान ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि अफगाणिस्तानचा घातक लेगस्पिनर राशिद खान यांची त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली आहे. त्याला वेगवान गोलंदाज म्हणून स्थान देण्यात आले.
शोएब अख्तरने वेगवान गोलंदाज म्हणून ब्रेट ली आणि लसिथ मलिंगाची निवड केली आहे.
ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, आंद्रे रसेल, किरॉन पोलार्ड, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हरभजन सिंग, रशीद खान, ब्रेट ली आणि लसिथ मलिंगा.