फोटो सौजन्य - नवराष्ट्र टीम
India W vs Sri Lanka W ODI World Cup 2025 : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाला आज सुरुवात झाली आहे. भारताचा संघ हा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. तर श्रीलंकेचे कर्णधारपद हे चामरी अथापथु सांभाळणार आहे. दोन्ही संघ आज विश्वचषकाचा पहिला सामना खेळणार आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणारा हा विश्वचषकाचा पहिला सामना गुवाहाटीमधील बारसापारा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. श्रीलंकेच्या संघाने मागील काही सामन्यांमध्ये चांगले कामगिरी केली आहेत त्यामुळे ते टीम इंडियासाठी नक्कीच आव्हान उभे करू शकतात.






