फोटो सौजन्य - ICC
दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड : महिला T२० विश्वचषक २०२४ चा आज अंतिम सामान रंगणार आहे. या सामन्याचे आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे. त्यामुळे आज जगाला नवा चॅम्पियन मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाची विश्वचषकातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यत संघाला फक्त एक सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला इंग्लंड विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर त्यानंतर त्यांनी साखळी सामन्यांमध्ये बांग्लादेश, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिजच्या संघाचा पराभव केला होता. त्याचबरोबर उपांत्य फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विश्वचषकामध्ये एकही सामना न गमावलेला संघ ऑस्ट्रेलियाचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
न्यूझीलंड संघाची T२० विश्वचषक २०२४ मधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर संघाने आतापर्यत सांखळी सामन्यांमध्ये एक सामना गमावलेला आहे. न्यूझीलंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होते. तर न्यूझीलंडने भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघाला पराभूत करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. आता दोन्ही संघानी साखळी सामन्यांमध्ये एक-एक सामना गमवावा लागला आहे. आता आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे. या सामन्यानंतर आज जगाला नवा विश्वविजेता संघ मिळणार आहे.
Two teams, one #T20WorldCup trophy 🏆
Who etches their name in the history books? pic.twitter.com/v0Hj4xvVTd
— ICC (@ICC) October 20, 2024
न्यूझीलंडच्या महिला संघाने 2000 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता परंतु त्या ऐतिहासिक विजयात किवींनी चांगली कामगिरी केली होती. महिला T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंड संघ सलग दहा सामने हरला होता. पण त्यानंतर त्यांनी विश्वचषकामध्ये कमालीची कामगिरी केली आहे, दोन्ही संघ क्रिकेट विश्वामधील मजबूत संघ आहेत त्यामुळे कोणता संघ आज विश्वविजेता होणार हे सांगणं कठीण आहे.
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, मारिजने कॅप, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, तुमी सेखुखने. अयांदा हलुबी, शेषानी नायडू, मिके डी रिडर.
सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, मॉली पेनफोल्ड, जेस केर, हॅना रोवे, लेह कास्परेक.