Rohit Sharma, Shubman Gill And Babar Azam (Photo Credit - X)
ICC ODI Ranking: वेस्टइडिंज आणि पाकिस्तान (WI vs PAK) यांच्यामध्ये वनडे मालिका खेळवली गेली. या मालिकेनतंर आयसीसीने वनडे रॅंकिंग जाहीर (ICC ODI Ranking) केली असुन यामध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहे. दरम्यान पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझमला (Babar Azam) मोठे नुकसान झाले आहे. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) दुसऱ्यास्थानी झेप घेतली आहे. तर भारतीय स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. आपन टॅाप १० मध्ये कोणते बदल झाले आहे पाहून घेवूया.
आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे रॅंकिंगमध्ये शुभमन गिलने पहिल्या स्थानावर कायम आहे. शुभमन गिलचे रेटिंग सध्या ७८४ आहे. गिलने काही काळापासून एकही एकदिवसीय सामना खेळला नसला तरी, त्यानंतरही त्याच्या खुर्चीला कोणताही धोका नाही. दरम्यान, भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग ७५६ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. दरम्यान, रोहित शर्मालाही न खेळता फायदा झाला आहे, याचे कारण बाबर आझम आहे.
🚨 ICC ODI BATTERS RANKING 🚨
1) Shubman Gill – 784 rating.
2) Rohit Sharma – 756 rating.
4) Virat Kohli – 736 rating.
8) Shreyas Iyer – 704 rating. pic.twitter.com/7sEOOtNr73— Johns. (@CricCrazyJohns) August 13, 2025
खरं तर बाबर आझम मागील क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता, परंतु वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बाबर आझमची कामगिरी खूपच खराब होती. यानंतर, बाबर आझमची सरासरी खाली आली आहे, तसेच तो रँकिंगमध्येही खाली आला आहे. बाबर आझमचे रेटिंग आता ७५१ वर आले आहे. जर बाबर असाच खेळत राहिला तर सध्या चौथ्या क्रमांकावर असलेला विराट कोहलीही त्याला मागे टाकेल.
तसेच विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याचे रेटिंग सध्या ७३६ आहे. डॅरिल मिशेल पाचव्या क्रमांकावर आहे आणि चरिथ अस्लंका सहाव्या क्रमांकावर आहे. आयर्लंडचा हॅरी टेक्टर सातव्या क्रमांकावर आहे आणि भारताचा श्रेयस अय्यर आठव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान नवव्या क्रमांकावर आहे, तर श्रीलंकेचा कुसल मेंडिस दहाव्या क्रमांकावर आहे. म्हणजेच बाबर आझम आणि रोहित शर्मा वगळता टॉप १० मध्ये कोणाच्याही क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही.
जर आपण आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत गोलंदाजांवर नजर टाकली तर टॉप १० मध्ये कोणताही बदल झालेला नाही. महेश तीक्षणा पहिल्या स्थानावर आहे, तर भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे तर रवींद्र जडेजा ९ व्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा गुडाकेश मोती ५ स्थानांनी पुढे गेला आहे. त्यामुळे तो १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दुसरीकडे, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी १ स्थानाने मागे गेले आहे. शमी आता १४ व्या क्रमांकावर आहे, तर सिराज १५ व्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचा जेडेन शिल्स आता २४ स्थानांनी पुढे जाऊन ३३ व्या क्रमांकावर आहे.