Under-19 World Cup 2026 : टांझानियाचा भीम पराक्रम! पहिल्यांदाच ठरला २०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी पात्र.. (फोटो-सोशल मीडिया)
Tanzania qualifies for 2026 U-19 World Cup : जगभरात आता क्रिकेट या खेळाची आवड निर्माण होऊ लागली आहे. अनेक देश क्रिकेटमध्ये रस दाखवताना दिसून येत आहेत. जगभरात क्रिकेटच्या अनेक स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. परंतु, क्रिकेटच्या चांगल्या व्यवस्थेच्या अभावी काही देश इच्छा असून देखील त्यासाठी पात्र ठरू शकत नाहीत. ही एक शोकांतिका आहे. परंतु, ज्या देशाला क्रिकेट स्पर्धेत पात्रता मिळवण्याची संधी मिळते, त्यांच्यासाठी ते एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नसते. असेच एका देशाची स्वप्नपूर्ती झाली आहे. लहान आफ्रिकन देश टांझानियासाठी आनंदाची एक बातमी समोर आली आहे. खरंतर, टांझानियाने क्रिकेटसाठी एक नवा भीम पराक्रम केला आहे. या देशाचा क्रिकेट संघ पहिल्यांदाच २०२६ च्या आयसीसी अंडर १९ विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. टांझानिया देशाने एक नवा इतिहास रचला आहे.
या आनंदांच्या बातमीने या देशातील संपूर्ण क्रिकेट चाहत्यांना सुखाचा धक्का बसला आहे. टांझानियाच्या संघाने आफ्रिकन प्रादेशिक पात्रता स्पर्धेमधील आपले पाचही सामने जिंकले आहे. याचमुळे ते २०२६ च्या आयसीसी अंडर-१९ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. ही बाब या देशासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाहीये. एक उल्लेखनीय गोष्ट अशी की, पुढच्या वर्षी २०२६ मध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया या देशांना १९ वर्षांखालील विश्वचषक आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. या दरम्यान टांझानियातील खेळाडू देखील यामध्ये सहभागी होताना दसिऊं येणार आहेत.
टांझानियाने अंडर-१९ विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यासाठी शानदार कामगिरी केली. टांझानियाने गट फेरीतील सलग तीन सामने जिंकले आहेत. यानंतर, २०२४ मध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात टांझानियाने रवांडाचा आणि अंतिम सामन्यात सिएरा लिओनचा पराभव केला होता. यानंतर देशाने आफ्रिकेच्या विभाग १ मध्ये स्थान पटकावले. या कालावधीत टांझानियाने ५ सामने जिंकून १० गुण मिळवले.
हेही वाचा : MI vs RCB : कोहलीचा स्वॅगच निराळा! धोकादायक बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर लगावला षटकार.., पहा व्हिडिओ
आता २०२६ चा १९ वर्षांखालील विश्वचषककाचे झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये आयोजन करण्यात येणार हेत. या स्पर्धेत जगभरातील एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. यासह, टांझानिया या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा १२ वा संघ ठरला आहे. सध्या त्यात सहभागी होणारे चार संघ अजूनही बाकी आहेत.