मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)
Mohammed Siraj praises Kirmani : विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात शानदार यश मिळवले. इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात दमदार कामगिरी करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या दौऱ्यात सर्वांचे मन जिंकले आहेत. ओव्हल येताहेत खेळवण्यात आलेल्या शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात इंग्लंडला ६ धावांनी पराभूत करून भारताने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २-२ अशी बरोबरी साधली. या संपूर्ण मालिकेत आपल्या प्रभावी गोलंदाजीने मोहम्मद सिराजने २३ बळी टिपले. तोच शेवटच्या सामन्यांतील विजयाचा हिरो ठरला.
हेही वाचा : RCB चा वेगवान गोलंदाज यश दयालवर UP T20 League मध्ये बंदी! खेळाडूचं करिअर धोक्यात
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका मोहम्मद सिराजसाठी उत्कृष्ट राहिली. तो मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. ओव्हल कसोटी सामन्यात त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. सिराज गेल्या काही काळापासून भारतासाठी एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये चांगले योगदान देताना दिसत आहे.
इंग्लंड मालिकेनंतर, स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज आता त्याच्या हैदराबादमधील घरी विश्रांती घेत आहे. या भागात, तो हैदराबादमध्ये आयोजित सय्यद किरमानी यांच्या आत्मचरित्र ‘स्टम्प्ड, लाइफ बिहाइंड अँड बियॉन्ड द ट्वेंटी यार्ड्स’ या पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहिला होता. यादरम्यान मोहम्मद सिराज यांनी दिग्गज खेळाडू सय्यद किरमानी यांचे तोंडभरून कौतुक केले.
सैयद किरमानी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला मोहम्मद सिराजने हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी माजी दिग्गजांचे खूप कौतुक केले. किरमानींबद्दल बोलताना सिराज म्हणाला की, “सर, जेव्हा तुम्ही १९८३ चा विश्वचषक जिंकला होता तेव्हा आमचा जन्म देखील झाला नव्हता. भारतीय क्रिकेट संघाला इतकं सर्व काही दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.” पुढे किरमानी यांनी देखील भारताच्या स्टार मोहम्मद सिराजचे कौतुक केले. किरमानी यांनी सांगितले की, “सिराजने इंग्लंड मालिकेत शानदार कामगिरी केली.”
हेही वाचा : रोहित – विराट ODI क्रिकेटला करणार अलविदा? 2027 च्या विश्वचषकापूर्वी होणार मोठा निर्णय
किरमानी सिराजला म्हणाले की, “माझ्याकडून तुमचे अभिनंदन. तुम्ही तुमच्या उत्साहाच्या मदतीने देशाला गौरव मिळवून दिला असून आक्रमकता मनापासून आली आहे. मी तुमच्या यशासाठी प्रार्थना करतो.”
सय्यद किरमानी यांच्या पुस्तकाबद्दल सांगायचे झाल्यास किरमानी यांनी या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील क्रिकेटशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचे आणि त्यांनी मैदानावर घालवलेले जीवन याबाबत या पुस्तकात वर्णन करण्यात आले आहे.