डेवाल्ड ब्रेव्हिसव(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : ‘रोहित शर्मा हा सर्वकालीन महान नाहीच…’, संजय मांजरेकरांचे वादग्रस्त विधान ठरले चर्चेचा विषय
डेवाल्ड ब्रेव्हिसने जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली होती. लिलावा दरम्यान जोबर्ग सुपर कॅपिटल्सने त्याच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान त्याला खरेदी करण्यास पार्ल रॉयल्सने देखील रस दाखवला होता. तथापि, बोली ११ दशलक्ष रँडपर्यंत पोहचली होती. तेव्हा पार्ल रॉयल्सने माघार घेतली आणि प्रिटोरिया कॅपिटल्सने संघात प्रवेश केला. शेवटी, जोबर्ग सुपर कॅपिटल्सकडून माघार घेण्याचा निर्णय आणि प्रिटोरिया कॅपिटल्सने मोठ्या बोलीवर त्यांच्या संघात देवाल्ड ब्रेव्हिसचा समावेश करून घेतला.
देवाल्ड ब्रेव्हिससाठी बोली लावण्यावर सौरव गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “मी खूप आनंदी आहे. तो एक खूप चांगला प्रतिभावान खेळाडू आहे. प्रिटोरियातील आमच्या खेळपट्टीवर आणि आमच्या मैदानावर, मला आशा आहे की तो शानदार कामगिरी नक्की करेल. एका वर्षात त्याचा खेळ प्रगती करत आहे आणि तो गेम-चेंजर असा खेळाडू आहे.” देवाल्ड ब्रेव्हिसला आपल्या संघात घेण्यासाठी प्रिटोरिया कॅपिटल्सने त्यांच्या पर्सपैकी ५१.५ टक्के पैसा खर्च केला आहे.
सौरव गांगुलीने ब्रेव्हिसबद्दल सांगताना म्हटले की, “मला वाटते की ब्रेव्हिस एक जबरदस्त प्रतिभा असणारा खेळाडू आहे. गेल्या दीड वर्षात त्याच्या खेळामध्ये खरोखरच खूप प्रगती झाली आहे, त्याचा खेळ आपण सर्वांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाहिले आहे. त्या दौऱ्यामध्ये त्याने दाखवून दिले की तो खूप मोठा गेम चेंजर आहे आणि टी-२० क्रिकेटमध्ये तुम्हाला नेमके तेच हवे असते. पैशांसह कामगिरी. १६.५ दशलक्ष रुपयांव्यतिरिक्त, मला असे वाटते की तो एक उत्तम प्रतिभा असणारा आहे. तो फिरकी खूप चांगला खेळतो, जे अत्यंत महत्वाचे आहे. हे सर्वकाही लक्षात ठेवून, म्हणूनच त्याने ते केले आहे.”
हेही वाचा : Asia cup 2025 : अफगाणिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय; हाँगकाँगसमोर ‘पठाणी’ फालदाजांचे आव्हान






