Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केवळ पाणी पाजत राहिले, तरी 'या' 3 खेळाडूंना मिळणार करोडो रुपये.. (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Champion Trophy 2025 : आज 9 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाता आहे. भारत आणि न्यूझीलंड या संघात अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघ आपल्या प्लेइंग 11 मध्ये फार कमी बदल करत असतो. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सपूर्ण स्पर्धेत असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. टीम इंडियाकडून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेसाठी निवडलेल्या 15 पैकी फक्त 12 खेळाडूंचाच वापर करण्यात आला आहे. त्याच वेळी, संघात असे तीन खेळाडू आहेत ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळला नाही. त्यांना अंतिम फेरीत देखील संधी मिळालेली नाही. असे असले तरी उल्लेखनीय बाब अशी की, तिन्ही खेळाडू बेंचवर बसून देखील करोडो रुपयांचे मानकरी ठरणार आहेत.
एक सामनाही न खेळता पैशांची बरसात..
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत सर्व सामाने जिंकले आहेत. या दरम्यान संघाने आपल्या प्लेइंग 11 मध्ये फक्त एक बदल केला आहे. पहिल्या दोन सामन्यात खेळलेल्या हर्षित राणाच्या जागी आता वरुण चक्रवर्ती खेळत आहे. याशिवाय, उर्वरित सर्व 10 खेळाडू प्लेइंग 11 चा भाग राहिले आहेत. त्यामध्ये काही एक बदल केलेला नाही. भारतीय संघातील ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग यांनी या स्पर्धेत एकही सामना खेळालेला नाही. मात्र, या गोष्टीचा या तिन्ही खेळाडूंच्या कमाईवर कोणताही परिणाम होणार नाहीये.
हेही वाचा : IND vs NZ Final : रोहित शर्माच्या यशस्वी कर्णधारपदावर डाग; अंतिम सामन्यात रचला ‘हा’ नकोसा विक्रम..
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ( BCCI ) प्लेइंग 11 मधून बाहेर बसलेल्या खेळाडूंचे सामने पुढे ढकलत असते. याशिवाय प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना इतर सर्व सुविधाही या खेळाडूंना दिल्या जातात. त्याच वेळी, स्पर्धा जिंकल्यानंतर, या तीन खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंइतकीच बक्षीस रक्कम मिळणार आहे. हे खेळाडू बीसीसीआयने जेतेपद पटकावल्याबद्दल जाहीर केलेल्या बक्षिसांचे तितकेच हक्कदार असणार आहेत.
हेही वाचा : IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये 5 हजार कोटी डावावर; अंडरवर्ल्ड बेटिंग मार्केटची ‘या’ संघाला विजयी पसंती..
चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाता आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने उभे ठाकले आहेत. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने 1 विकेट गमावून 127 धावा केल्या आहेत. या बदल्यात 4 विकेट्स गामावल्या आहेत. विल यंग 23 चेंडूत 15 रन काढून वरुण चक्रवर्तीचा शिकार ठरला आहे. फॉर्ममध्ये असणारा रचीन रविद्र 29 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. त्याला कुलदीप यादवने आपल्या गुगलीवर आऊट केले. तर भरवशाचा फलंदाज केन विल्यमसनही (14 चेंडूत 11 धावा) फार काही करू शकला नाही. त्याला देखील कुलदीपने आपल्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड केला. रवींद्र जाडेजाने न्यूझीलंडला चौथा झटका दिल आहे. त्याने टॉम लॅथम एलबीडब्लू आऊट केले. टॉम लॅथमने 30 चेंडूत 14 धावा केल्या आहेत. भारताकडून कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर जाडेजा आणि वरुन चक्रवर्तीने प्रत्येकी एक विकेट मिळवली आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क आणि नाथन स्मिथ.