ब्रॉक लेसनर निवृत्त (फोटो- ट्विटर)
#WWE : Brock Lesnar is officially retired. From a South Dakota farm to the top of every combat sport. -NCAA Champion.
-UFC Heavyweight Champion.
-Youngest WWE Champion.
-Ended the Undertaker’s Streak.
-Multiple-time world champion across promotions. pic.twitter.com/73co4wQcYR — Rajat Jain (@RajatJain) August 4, 2026
WWE मधील सर्वात दिग्गज खेळाडू मानल्या जाणाऱ्या ‘द बीस्ट’ ब्रॉक लेसनरने एका कार्यक्रमात बोलताना त्याने आपल्या निवृत्तीवर शिक्कामोर्तब केले. २८ वर्षीय नायजेरियन स्टार ओबा फेमीविरुद्ध झालेल्या पराभवाने हा आपल्या करकीर्दीमधील शेवटचा सामना असल्याचे देखील त्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे WWE क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी मिनियापोलिस येथे पार पडलेल्या समरस्लॅम इव्हेंटमध्ये ब्रॉक लेसनर आणि २८ वर्षीय नायजेरियन स्टार ओबा फेमी यांच्यात ऐतिहासिक ‘हेल इन अ सेल’ सामना झाला.
काय म्हणाला ब्रॉक लेसनर?
“मी आज संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की मी आज निवृत्त झालो आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावुक होता. फेमीकडून पराभूत झाल्यानंतर मी माझे बूट आणि हातमोजे रिंगमध्ये सोडले होते. मे महिन्यात ‘क्लॅश इन इटली’मध्ये मी पुनरागमन करून त्याला हरवले, पण समरस्लॅमच्या सामन्यानंतर मला स्पष्ट जाणवले की आता रिंगमधील माझा प्रवास इथेच थांबवायला हवा.






