सौजन्य - zaheer_khan34 sagarikaghatge 'तू मला तुझ्या सुंदर आयुष्यासाठी निवडलेस.........'; सागरिकाने इन्स्टावर पोस्ट टाकत साजरा केला लग्नाचा वाढदिवस
Sagarika Ghatge and Zaheer Khan’s wedding anniversary : प्रिय नवरोबा, तू अद्वितीय आहेस, जीवनाच्या या उतार-चढावामध्ये तूच आहेस जो या जीवनाला सार्थक बनवतोयस. मी पुन्हा पुन्हा तुझ्यासोबत असे सुंदर जीवनाची अपेक्षा करते. तू मला तुझ्या सुंदर आयुष्यात आणलेस त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. असे गोड पोस्ट टाकत झहीर खानची पत्नी तथा प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगेने पोस्ट टाकत झहीरला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दोघांचा प्रेमविवाह
भारताचा आघाडीचा माजी गोलंदाज झहीर खान आणि सागरिका घाटगे यांचा आज लग्नाचा वाढदिवस. सागरिकाने झहीर आणि दोघांचा सुंदर फोटोसह पोस्ट टाकत लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यामध्ये तिने झहीर खानला मला तुझ्या आयुष्यासाठी निवडेस असे म्हणत आभार व्यक्त केले आहेत. दोघांची लग्नाची कथासुद्धा एखाद्या चित्रपटासारखी आहे. दोघांनी प्रेमविवाह केलेला आहे. झहीरने 2017 मध्ये झहीरने बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत लग्न केले. परंतु, दोघेही लग्नापूर्वी एकमेकाला डेट करीत होते. दोघांची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी आहे. झहीरने 2011 च्या विश्वचषकात भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सागरिकाने इन्स्टावर सुंदर पोस्ट टाकत झहीरसोबत केला लग्नाचा वाढदिवस साजरा
एका पार्टीत झहीर आणि सागरिका यांची भेट
झहीर खानची प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही. त्याने बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिच्याशी लग्न केले आहे. चक दे इंडियासोबतच सागरिकाने फॉक्स, मिले ना मिले हम आणि रास या चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघेही एका पार्टीत काही मित्रांच्या माध्यमातून भेटले होते. काही भेटीनंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. मात्र, दोघांनीही आपले नाते नेहमीच गोपनीय ठेवले. युवराज सिंगच्या लग्नात दोघेही पहिल्यांदा एकत्र दिसले होते.
झहीर आपल्या पत्नीसोबत करतो पूजाअर्चा
झहीर खान आपल्या पत्नीसोबत पूजा करतो आणि मंदिरातही जातो. मात्र, कट्टरवाद्यांना हे पटत नाही. यामुळे त्यांना सोशल मीडियाच्या पोस्टवर खूप शिव्या ऐकाव्या लागतात. झहीर कधीच त्याची पर्वा करत नाही आणि आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगतो.
घरच्यांना समजवताना खूप त्रास
सागरिकासोबत लग्न करण्यासाठी झहीरला घरच्यांना पटवून देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. तिच्या कुटुंबीयांनी सर्वप्रथम सागरिकाच्या ‘चक दे इंडिया’ चित्रपटाची सीडी मागवली. चित्रपट पाहिल्यानंतरच लग्नासाठी तयार झालो. दोघांनी नोव्हेंबर 2017 मध्ये लग्न केले. सागरिका घाटगे या राजघराण्यातील आहेत. ते कोल्हापूरच्या शाहू महाराजांशी संबंधित आहेत. त्यांचे वडील कागल राजघराण्यातील आहेत. त्यांची आजी सीताराजे घाटगे या इंदूरच्या तुकोजीराव होळकर तिसऱ्या यांच्या कन्या आहेत.
झहीरची चमकदार कारकीर्द
झहीर खानची क्रिकेट कारकीर्द चमकदार आहे. त्याने भारतासाठी 92 कसोटी, 200 एकदिवसीय आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्या नावावर कसोटीत 311, वनडेमध्ये 282 आणि टी-20मध्ये 17 विकेट्स आहेत. 11व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी 75 धावांची सर्वात मोठी खेळीही खेळली आहे. यासोबतच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार चेंडूंवर चार षटकार मारणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.