विराट कोहलीचा नागिण डान्स व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)
विराट कोहली हा नेहमीच मैदानावर मजेशीर पद्धतीने डान्स करतो अथवा सरावादरम्यानही त्याची मस्ती चालू असते आणि त्यामुळेच तो सर्व खेळाडूंमध्ये खूपच प्रिय आहे. कोणाची मिमिक्री करणं असो वा एखाद्याची टर खेचणे असो इतकंच नाही तर गाण्यावर मैदानात खुलेआम डान्स करणं असो विराट यामध्ये अव्वल आहे. आता विराटचा सामन्यापूर्वीचा नागिण डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
‘तुझ्या कॅप्टन्सीमध्ये माझे पदार्पण…’ हार्दिक झाला भावूक, रोहित शर्माने केली MI मध्ये 15 वर्ष पूर्ण
सरावादरम्यान कोहलीचा ‘Naagin Dance’
Virat Kohli funny nagin dance.😂 pic.twitter.com/FfMebuq5Vy — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) April 10, 2026
राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी विराट कोहली थोड्या खेळकर मूडमध्ये दिसला. वॉर्म-अप करताना, त्याने अचानक ‘नागिण’ नृत्याच्या स्टेप्स करायला सुरुवात केली. त्याच्या या स्टेप्समुळे स्टँडमधील चाहत्यांनी जल्लोष केला. विराट जेव्हा मूडमध्ये असतो तेव्हा सर्वच चाहत्यांना आनंद होतो आणि मैदानात विराट अशा पद्धतीने सर्वांचेच मनोरंजन करताना दिसतो.
मात्र, कोहलीची फलंदाजी तितकी प्रभावी ठरली नाही, कारण तो १६ चेंडूंमध्ये केवळ ३२ धावाच करू शकला. आरसीबीने २० षटकांत २०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चार गडी गमावून १८ षटकांतच हे लक्ष्य पूर्ण केले.
RCB चा पुढील सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना गमावला असला तरी, आपल्या सलामीच्या दोन्ही सामन्यांतील विजयांमुळे, तीन सामन्यांनंतर चार गुणांसह ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. आरसीबीचा नेट रन रेट १.२३१ आहे. त्यांचा पुढील सामना १२ एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार असून, त्यामुळे हा सामना अत्यंत उत्सुकतेचा ठरणार आहे.






