नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हरिणी नीलकंतन या नृत्यागंनाने अमेरिकेच्या लास वेगास येथे आयोजित रेड बुल डान्स स्टाइल स्पर्धेत असा काही परफॉर्मन्स दिला आहे की पाहून सर्व प्रेक्षकही आवाक् झाले आहेत. हरिणीने पाश्चात्य हिप-हॉप आणि भारतीय प्राची शास्त्रीय नृत्यू भरतनाट्यमचे फ्युजर सादर केले आहे. तिचे स्टेप्स, हावभाव, फूटवर्क पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आहे. जगभरातून या तरुणीचे कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @redbulldance या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २.१ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. एकीकडे या तरुणीचे प्रचंड कौतुक केले जात आहे. अतिशय विलक्षण आणि अद्वीतयपणे नृत्य सादर केले असून तुला भारत सरकारकडून सन्मास पत्र मिळाले पाहिजे असे अनेकांनी म्हटले आहे. परंतु दुसरीकडे काहींनी हा भरतनाट्यमचा अपमान असल्याचे म्हटले आहे. यामुळे सोशल मीडियावर दोन गटांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे कला ही कला असते असे लोकांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे शास्त्रीय नृत्याचे पावित्र्य भंग झाले असे काहींचे म्हणणे आहे. मात्र या तरुणीने इंटरनेटवर आग लावली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






