लखनौ सुपर जाएंट्समध्ये कॅरेबियन प्लेअरची जागा निश्चित
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन हा इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी पहिला अधिकृत रिटेन केलेला खेळाडू बनला आहे. वृत्तानुसार, कोलकात्यात लखनौ सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांची भेट घेऊन पुरनने करारावर शिक्कामोर्तब केले आहे. पुरन आणि लखनौ यांच्यातील हा करार नंबर वन टिकवण्यासाठी आहे. म्हणजेच निकोलस पुरनला लखनौ सुपरजायंट्समध्ये 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात येईल असा करार करण्यात आला आहे.
वास्तविक, यापूर्वी असे मानले जात होते की कर्णधार केएल राहुलला 18 कोटींमध्ये कायम केले जाईल, परंतु फ्रँचायझी आणि राहुल यांच्यात चर्चा झाली नाही असे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे निकोलस पूरनने ही संधी साधली असल्याचीही चर्चा आहे. अशा परिस्थितीत, जर निकोलस पूरनला लखनौने 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले, तर या लीगमधील वेस्ट इंडिजच्या या फलंदाजासाठी ही सर्वात मोठी रक्कम असेल. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
आधीची किंमत 16 कोटी
निकोलस पूरन हा टी-20 क्रिकेटमधला हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून ओळखला जातो. यामुळेच या फॉर्मेटमध्ये पूरनबाबत खूप हाईपदेखील आहे. 2023 मध्ये लखनौच्या टीमने 16 कोटी रुपयांची बोली लावून निकोलसची खरेदी केली होती. लखनौला येण्यापूर्वी निकोलस पूरन सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता, पण जेव्हा तो लखनऊ सुपरजायंट्स संघात सामील झाला तेव्हा त्याची कामगिरी जबरदस्त झाली आहे.
हेदेखील वाचा – Champions Trophy: पाकिस्तानचा नवा कॅप्टन रिझवानची आशा, ‘भारताचे पाकिस्तानमध्ये…’
काय आहे कारण
यामागचे मोठे कारण म्हणजे गेल्या मोसमात लखनौसाठी निकोलस पूरनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 178.21 च्या स्ट्राईक रेटने 499 धावा केल्या, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. यामुळेच निकोलसचा लखनऊसोबत 18 कोटींचा करार निश्चित झाला आहे असा तर्क लावण्यात येत आहे.
केएल राहुलचे भविष्य काय?
केएल राहुल सध्या फॉर्ममध्ये नाही यात शंका नाही, पण जर राहुल लिलावात आला तर अनेक फ्रँचायझी त्याला मैदानात उतरवू शकतात. विशेषत: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला त्यांच्यासोबत राहुलचा समावेश करायचा असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत लखनऊ संघाने राहुलला सोडले तर तो आरसीबी संघात सामील होण्याची सर्वाधिक शक्यता आहे असे सध्या म्हटले जात आहे. मात्र LSG के एल राहुलला सोडून देणार की नाही याची चर्चा सध्या अधिक रंगली आहे.
नक्की काय घडले होते?
मागच्या वर्षी आयपीएल दरम्यान लखनौ संघाचे मालक संजीव गोएंका आणि के एल राहुलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये संघ हरल्यानंतर राहुलला संजीव गोएंका यांचा राग संपूर्ण जगासमोर पत्करावा लागला होता आणि यानंतर संजीव गोएंका यांना खूपच ट्रोलही करण्यात आले होते. मात्र के एल राहुलने याबाबत मौन बाळगणे अधिक योग्य समजले आणि त्याने या घटनेवर कुठेही कोणतीही चर्चा केली नाही.