जोस बटलरने दिला कर्णधारपदाचा राजीनामा (फोटो-सोशल मीडिया)
Jos Butler : सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार सुरू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड संघाला आपल्या सुमार कामगिरीचा फटका बसला आहे. त्यांची या स्पर्धेतील कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. परिणामी इंग्लंड संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर जावं लागलं आहे. त्यातच आता इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता इंग्लंडचे कर्णधारपद कोणाकडे जाणार? अशी चर्चा रंगली आहे.
जोस बटलर याने इंग्लंड संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे यापुढे इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची धुरा कोण संभाळणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. अशा परिस्थितीतमध्ये कर्णधारपदाच्या शर्यतीत तीन खेळांडूचे नाव चर्चेत आहेत. ज्यामध्ये जो रूट, हॅरी ब्रुक आणि बेन डकेट यांच्या नावाचा समावेश आहे.
जो रूट सदया इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार आहे. त्याला आतापर्यंत एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देण्यात आलेले नाही. त्याच्या एकूण अनुभव बघता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून रूटकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याची शक्यता आहे. तसेच रूटचा फॉर्मही चांगला आहे.
इंग्लंड संघाचा उदयोन्मुख तारांकित खेळाडू हा हॅरी ब्रुक संघाचा पुढचा कर्णधार असण्याची शक्यता आहे. त्याचा अलिकडचा फॉर्म फारसा चांगला नाही तसेच आता सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. परंतु, २०२४ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, त्याने ७८ च्या सरासरीने ३१२ धावा चोपल्या आहेत.
बेन डकेटने आपण सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहोत ही आपल्या खेळाने दाखवून दिले आहे. त्याचा फॉर्मही जबरदस्त असून त्याने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही चांगल्या धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने १६५ धावांची खेळी खेळून सर्वांचे लक्ष वेधले होते. डकेट सध्या संघाचा उपकर्णधार सुद्धा आहे.
हेही वाचा : ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! Champions Trophy 2025 च्या सेमीफायनलमध्ये हा ओपनर होऊ शकतो बाहेर
जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३५१ धावांचा डोंगर उभारून देखील संघाला पराभवाचा सामाना करावा लागला आहे.तसेच दुसऱ्या सामन्यात देखील इंग्लंडला अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवानंतर मात्र इंग्लंड क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे स्वप्न भंगले.
जोस बटलर (कर्णधार), फिल साल्ट (विकेटकिपर), बेन डकेट, जेमी स्मिथ, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड