इंग्लंड संघ(फोटो-सोशल मीडिया)
Chris Woakes announces retirement from cricket : भारतीय संघ आपल्या घरच्या मैदनावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेत इंग्लंड संघाचा महत्वाचा स्टार असलेल्या खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ख्रिस वोक्स असे त्या खेळाडूचे नाव आहे. आता हा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना मैदानात दिसणार नाही. त्यामुळे त्याची १४ वर्षांची कारकीर्दीचा शेवट झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, ख्रिस वोक्सची आगामी अॅशेस मालिकेसाठी संघात निवड करण्यात आलेली नाही.
ख्रिस वोक्सची निवृत्ती जाहीर
इंग्लंडचा अनुभवी स्टार अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने वयाच्या ३६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे. ख्रिस वोक्सने २०१३ मध्ये पदार्पण केले होते. त्याने इंग्लंडसाठी एकूण २१७ सामने खेळले आहेत, त्याने संघाला अनेक वेळा संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. निवृत्तीची घोषणा करताना वोक्स म्हणाला की, “आता वेळ आली आहे आणि मी आता ठरवले आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. लहानपणापासूनच माझी इंग्लंडसाठी खेळणे ही इच्छा होती आणि मी माझ्या अंगणात त्याबद्दल स्वप्न पाहत असायचो आणि ती स्वप्ने जगू शकलो याबद्दल मी खूप भाग्यवान आहे असे मला वाटते.” असे मत ख्रिस वोक्सने व्यक्त केले.
ख्रिस वोक्सचा क्रिकेटचा प्रवास २०१३ मध्ये सुरू कझाला. त्याने २०१३ मध्ये पहिल्यांदा इंग्लंडकडून पदार्पण केले. त्याने ६२ कसोटी सामने खेळले असून ज्यामध्ये त्याने १९२ विकेट्स घेतल्या आणि पाच वेळा पाच विकेट्स घेण्याची किमया साधली. २०१८ मध्ये लॉर्ड्सवर त्याने भारताविरुद्ध शतक देखील झळकवले होते. त्याने १२२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १७३ विकेट्स आणि ३३ टी-२० सामन्यात ३१ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा : IND vs PAK Final : अर्शदीप सिंगचा ट्रोलिंगचा अनोखा खेळ! पाकिस्तान खेळाडूंची पुरती केली बेइज्जती; पहा Video
२०२५-२६ अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघ नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. जिथे दोन्ही संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघाची नुकतीच घोषणा देखील करण्यात आली आहे. परंतु, क्रिस वोक्सला संघात संधी देण्यात आली नाही. त्यानंतर फक्त सहा दिवसांनी, क्रिस वोक्सकडून निवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. संघात स्थान न मिळाल्यामुळेच वोक्सकडून निवृत्तीचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.