ENG vs WI : ६,६,६,१,६,६…वेस्ट इंडिजच्या फलंदाजाचे वादळ घेंघावले(फोटो-सोशल मीडिया)
ENG vs WI : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा टी-२० सामना ४ विकेट्सने आपल्या खिशात घातला. पण, संघाचा नंबर-१ फिरकीपटू आदिल रशीद हा सामना मात्र कायम लक्षात राहणार आहे. ब्रिस्टलमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचे दोन फलंदाज जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांनी तूफान फटकेबाजी करत इंग्लिश फिरकीपटूच्या एका षटकात ३१ धावा काढल्या आहेत.
या षटकात होल्डर आणि शेफर्ड या दोघांनी मिळून ५ लांब षटकार लगावले आहेत. एकेकाळी असे वाटू लागले होते की, आदिल रशीदचा टी-२० मधील हा सर्वात लाजिरवाणा विक्रम असेल. यापूर्वी, माजी भारतीय स्टार खेळाडू युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सलग ६ षटकार लगावले होते. त्याच्या या खेळीने क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती.
हेही वाचा : रोहित शर्माकडील वनडेचे कर्णधारपद धोक्यात! विश्वचषक 2027 साठी BCCI नव्या योजनेच्या विचारात..
वेस्ट इंडिजच्या डावात १९ व्या षटकात ही तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने आदिल रशीदकडे चेंडू सोपविला होता. ज्याने आधी ३ षटकांत २८ धावा देऊन विकेट देखील घेतली होती. पण जेसन होल्डरने या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूंवर षटकारांची हॅटट्रिक लगावली. त्यानंतर, त्याने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर रोमारियो शेफर्डने हल्ला चढवत पुढच्या दोन चेंडूंवर गगनचुंबी षटकार मारला लगावले आणि या षटकात एकूण ३१ धावा चोपल्या.
Holder & Shepherd go BIGGGGG!! – 5️⃣ massive sixes in one brutal over! 🔥🧨#ENGvWI #SonyLIV pic.twitter.com/7upGAx9qUJ
— Sony LIV (@SonyLIV) June 8, 2025
ही षटक टाकल्यानंतर आदिल रशीद आता स्टुअर्ट ब्रॉडनंतर टी२० मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारा दुसरा इंग्लिश गोलंदाज ठरला आहे. २००७ च्या टी२० विश्वचषकादरम्यान, युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारून ३६ धावा वसूल केल्या होत्या.
हेही वाचा : ENG vs IND मालिकेत इरफान पठानला मिळणार काॅमेंट्री बाॅक्समध्ये एंन्ट्री! सिरीजमध्ये हे दिग्गज करणार समालोचन
आदिल रशीद सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे. तो आयसीसी टी-२० क्रमवारीत देखील चौथ्या स्थानावर आहे. तथापि, आता त्याच्या नावावर एका षटकात ३१ धावा देण्याचा लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी याला आयसीसी फेम ऑफ द हॉल यामध्ये सामील करण्यात आले आहे. भारताच्या कर्णधारासह इतर विदेशी खेळाडूंना देखील यामध्ये सामील करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन महान सलामीवीर खेळाडू मॅथ्यू हेडन आणि न्युझीलँडचा महान फिरकी गोलंदाज डॅनियम विक्टरी याला सामील करण्यात आले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि महान कर्णधार ग्रॅमी स्मिथ यांच्या नावाचा देखील समावेश आहे.